व्याख्यानमाला१९७३-२

यशवंतराव चव्हाण यांचा जीवनालेख चढता बढता आहे;  पण तो त्यांनी अनुभवलेल्या सामाजिक क्रिया—प्रतिक्रियांचा परिपाक आहे.

या व्याख्यानमालेतील व्याख्यानातून यशवंतरावांच्या जीवन-चरित्राची चर्चा होत रहावी हा प्रधान हेतू नाही. तर आज ज्या भारतीय समाजाच्या नि राष्ट्रीय जीवनाच्या समस्या आव्हानाचे स्वरूप घेऊन आपल्यापुढे उभ्या ठाकल्या आहेत त्या सामाजिक, राजकिय, आर्थिक समस्यांचा अभ्यास पूर्ण उहापोह अधिकारी व्यक्तिच्या नियोजित व्याख्यानातून व्हावा;  हाच प्रधान हेतु या व्याख्यान मालेचा आहे.

समष्यांना आत्मविश्वासाने सामोरे जाण्याचे धैर्य नव्या पिढीने, यशवंतरावांच्या सह्द्यतेने व अभ्यासूवृत्तीने दाखवावे. यशवंसरावांच्या एकाग्रतेने प्रत्येक समस्येचे मनन चिंतन करावे, यशवंतरावाच्या तर्कशुध्द पध्दतीने स्वत:चे निष्कर्ष काढावेत आणि यशवंतरावांच्या ध्येयनिष्ठेने व जिद्दीने ते निष्कर्ष व्यवहारात आणावेत ;! यशवंतरावांच्या भक्तिभावानें समाजाची नि मातृभुमीची सेवा करावी हीच उत्कट भावना या मागे अनुस्युन आहे!!

यशवंतरावांचे जीवन चरित्र हे नव्या पिढीला दीपस्तंभा सारखे मार्गदर्शक ठरणारे आहे. म्हणूनच नामदार यशवंतराव चव्हाण यांचे जीवन हा अभ्यासाचा विषय आहे, महाराष्ट्रातील सामाजिक नि राजकीय चळवळीचे प्रवाह समजून देणारा एक जीवन र-रोत खळाळून पुढे धावतो आहे अशा गतिमान व्यक्तिमत्वाच्या निमित्ताने जनजागरणाचा उपक्रम सुरू करावा;  त्यांच्या अभीष्टचिंतना बरोबरच विचार चिंतनाला सुरवात करावी. म्हणून हा सुयोग साधला आहे!

या व्याख्यानमालेत जे जे विचार मंथन, चिंतन होईल ते ते त्याच विचारवंतांच्या भाषेत “अक्षर”  करणाच्या हेतूने प्रतिवर्षी व्याख्यानांची पुस्तिका प्रसिध्द केली जावी हाही हेतू आहे. गेल्या वर्षीच्या व्याख्यानाची ही पहिली पुस्तिका समाज पुरूषाच्या हाती देताना एकच प्रार्थना:-

ना. यशवंतरावजीना राष्ट्रसेवेसाठी उदंड आयुरारोग्य लाभो! त्यांच्या जीवनाचा आदर्श नव्या पिढीला जीननाची विधायक दृष्टी देणारा ठरो !