व्याख्यानमाला-१९९५-९६

Vyakhyanmala 1995 96
यशवंतराव चव्हाण

व्याख्यानमाला

वर्ष २३ वे सन १९९५ व वर्ष २४ वे  सन १९९६

नगरपालिका नगरवाचनालय, क-हाड
-------------------------------

pdf inmg Ebook साठी येथे क्लिक करा 

मनोगत - अशोक शिवराम भोसले, नगराध्यक्ष

‘यशवंतराव चव्हाण व्याख्यानमाले’ त दिनांक १२, १३ व १४ मार्च १९९५ रोजी मा. चव्हाण साहेबांच्या जन्मदिनानिमित्त महाराष्ट्रातील एक ध्येयवादी विचारवंत, राजकारण – समाजकारण व अर्थकारणाचे गाढे अभ्यासक व व प्रभावी वक्ते प्राचार्य पी. बी. पाटील, सांगली यांची “महाराष्ट्राची जडण-घडण आणि यशवंतराव” या विषयावर अभ्यासपूर्ण अशी सलग तीन व्याख्याने झाली. आणि त्याच सालात दि. २५-११-१९९५ रोजी स्व. यशवंतरावजींच्या ११ व्या पुण्यतिथीदिनी महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव व अरुणाचल प्रदेशाचे माझी राज्यपाल मा. राम प्रधान, मुंबई यांचे “मी पाहिलेले एक अष्टपैलू व्यक्तिमत्व – यशवंतराव चव्हाण” या विषयावरील एक व्याख्यान, तसेच १९९६ सालातील ‘यशवंतराव चव्हाण व्याख्यानमालेमध्ये’ दिनांक १३ व १४ मार्च रोजी महाराष्ट्रातील ज्येष्ठ विचारवंत व प्रभावी वक्ते प्रा. ग. प्र. प्रधान, पुणे यांची “भारतीय लोकशाहीची वाटचाल” या विषयावर झालेली सलग दोन व्याख्याने, अशा या दोन वर्षांच्या व्याख्यानांची एकत्रित मुद्रित प्रत वाचकांच्या हाती देतांना मनाला एक प्रकारचे समाधान वाटते.

क-हाडचे सुपुत्र, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार व भारताचे उपपंतप्रधान मा. यशवंतराव चव्हाण यांचे नेत्रदीपक व्यक्तिमत्व आणि विशेषतः त्यांचे विचार नि उच्चारांचा सामाजिक, राजकीय, आर्थिक समस्यांचा आणि स्थित्यंतरांचा परिचय व्हावा व समाजातील विचारवंतांचे विचारधन मुक्तपणे उपलब्ध करून देण्याच्या हेतूने मा. यशवंतारव चव्हाणांच्या नांवाने सन १९७३ सालापासून “यशवंतराव चव्हाण व्याख्यानमाला” स्वतंत्रपणे आयोजित करण्यात आली आणि कांही विचारवंतांच्या सूचनेवरून या व्याख्यानमालेतील अभ्यासपूर्ण व्याख्याने पुस्तक रूपाने प्रकाशित करण्यात येऊ लागली.

मा. यशवंतराव चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या नांवाने व्याख्यानमाला सुरू केली ती गिनीज बुकात नोंद झालेले माजी नगराध्यक्ष मा. श्री. पी. डी. पाटील यांनी आणि तिला पाठींबा दिला त्यांच्या सहका-यांनी. यात पी. डी. पाटील साहेबांची योजकता व समयसूचकता सिद्ध होते.