थोरलेसाहेब पुण्यस्मृती अभिवादन (21)

प्रजासत्ताक राज्यपद्धती स्विकारतांच दोन वर्षांनी पहिली सार्वजनिक निवडणूक होवून आमचा पक्ष राज्यांत व देशांत सत्ताधारी बनला. याच दरम्यान भारत सरकारने पंचवार्षिक योजनेला प्रारंभ करुन दर पंचवार्षिक योजनेत करावयाच्या कामाचे नियोजन कार्यरत केले. पंचवार्षिक योजनेचा कार्यक्रम व स्थानिक गरजेच्या विकासनिर्मीतीचा कार्यक्रम एकाच वेळी सुरु राहिला. या सातत्यांत सर्व सहका-यांच्या सहभागामुळे भविष्यांतील गरजांची पुर्तता करणारे कार्यक्रम राबवत गेलो. जे प्रत्यक्ष आहे. त्यांत आधुनिकता आणण्याच्या प्रयत्नातून विकास जाणवू लागला. नव्या प्रकल्पाचे काम हाती घेतल्याने भविष्यांतील गरजा भागवणारी सुविधा निर्माण होणार आहे यावर जनमानसाचा विश्वास बसू लागला. या कालावधीत देशांत भाषावार प्रान्तरचनेचे धोरण स्विकारले गेले. आपल्या व शेजारच्या राज्यांत सिमा प्रश्न व धोरणातील तपशील पुर्णपणे न समजून घेण्यामुळे देशातील महत्वपूर्ण मानल्या गेलेल्या मुंबई शहराचा भाग राज्याला गमवावा लागेल या भीतीने राज्य व केंद्र शासनात दुराव होण्याची परिस्थीती निर्माण झाली. तथापी वास्तवातील गरज व नैसर्गीक न्यायाचा विचार करता मुंबई शहर हे आपल्याच राज्याचा भाग राहिल व इतर वादग्रस्त सिमारेषाही शाबूद रहातील असा आम्हांस विश्वास होता म्हणूनच प्रसंगी स्थानिकांचा रोष पत्करूनही सामोपचार व सबूरीचे धोरण स्विकारले व परिणामी यशस्वी होवून महाराष्ट्र राज्याची मुंबई राजधानी ठेवून यशस्वी झालो. तथापी या मागणीसाठी राज्यातील एकसुराची मागणी व त्यासाठी कोणताही त्याग करावयाची तयारी दाखवल्याने केंद्र शासनाकडे वास्तव मान्य करण्यांस आमच्या आग्रहाला मदत झाली. तथापी राज्यातील याविषयीच्या आग्रही प्रदर्शनामुळे काही अप्रिय अंमलबजावणी घडत गेली. तात्पुरती व्यवस्था म्हणून गुजराथसह द्विभाषिक राज्य म्हणूनही काही काळ आपल्याला काम करावे लागले. कालांतराने महाराष्ट्र राज्याची निर्मीती झाल्यावरच आपण आपल्य विकास कामाला सुरुवांत करु शकलो.

महराष्ट्र राज्याच्या निर्मीती नंतर सामाजिक सांस्कृतीक, औद्योगीक, शैक्षणीक आघाडीवर आपण एकजुटीने कामाला गती देण्यामुळे महाराष्ट्र हे देशांत अग्रगण्या राज्य म्हणून ओळखले जावू लागले. या आपल्या राज्याचे नेतृत्व करण्याची संधी मला मिळाली. नंतर केंद्र शासनांत कार्यरत असता राज्यातील विकासाच्या निश्चीत केलेल्या आराखड्याची अंमलबजावणी योग्यरित्या चालू आहे, हे माझे सहकारी व अनुयांयांच्या सहभागाने होत असल्याने सातत्य राहीले. माझे सहकारी व अनुयायी माझा शब्द प्रमाण मानून आपली कार्यपद्धत ठेवत विकास कामांत कार्यरत राहिले म्हणूनच तू मानलेला “महाराष्ट्राचा सुवर्णकाळ” हा मी किंवा इतरांनी मान्य कराव असाच आहे.

आपण मानत असलेल्या महाराष्ट्राच्या सुवर्ण काळांतील विकासाचे परिणाम जाणवायला लागताच “सुबत्ता लाभलेल्या कुटुंबातील शेतकरी शेतातील काम करताना सुस्त होत जातो किंवा काही प्रमाणांत सुबत्तेचा अभिमान वाढीला लागतो त्याप्रमाणे आमच्याच सहका-यातून काहींच्या अभिमान, अहंमपणा व महत्वकांक्षा वाढत जावून या सर्व एकत्रीत विकास परिणामाचा धनी मीच का होवू नये? या विचारांत राहून कारभारी होण्याची स्वप्ने पाहू लागला. काहीसा असाच परिणाम देश पातळीवरही वाढीला लागला व परिणामी प्रस्थापीताकडून होणा-या कामातील दुर्लक्षीत राहून गेलेल्या चुका शोधण्यांत नावांजलेल्या समाजसेवकांच्या शक्तीचा शक्तीपात होत राहीला. काही महत्वाकांक्षी समाजसेवकांनी तर मुख्य मठापासून फारकत घेवून स्वतंत्र मठ उभारला. याच नवीन मठ उभारणीच्या कामाला ज्यांना समाजसेवक ही उपाशीसुद्धा नव्हती तथापी भविष्यांत समाजसुधारक होण्याची पात्रता होती त्यांनीही लहानसहान स्वतंत्र मठ उभारले. स्वातंत्रपुर्व काळांत मोजकेच मठ होते व त्यांना स्वतंत्र विचारदिशा होती. तथापी नव्याने निर्माण होणारे मठे हे व्यक्ती केंद्रीत होवून समाज मन विस्कटत गेले. या प्रक्रियेत केवळ नवे-नवे मठ होत राहिले असे नव्हे तर नावांजलेल्या मठातील प्रस्थापितांनी जेष्ठ मठाधिपतीना बाजूला काढलेल्या मठाधिपतीनी जीवनभर अवलंबलेल्या सामोपचार व वितंडवाद झिडकारुन अलिप्त राहून पहाणे व प्रसंगी मौन धारण करणेच पसंत केले. याच दरम्यान काही तरुण प्रस्थापीतानी कोणालाच बरोबर न घेता मूळ मठाच्या कार्यप्रणालीशी फारकत न घेता आपला स्वतंत्र परंतु उत्साही मठ सुरु केला. वरील प्रक्रिया घडत असता मी स्वतः तुमच्याकडे वास्तव्यास होतो. मी स्वतःही काही काळ सर्वच कार्यप्रणाली पासून अलिप्त रहाव्या लागल्याच्या अनुभवाचा धनी होतो.