थोरलेसाहेब पुण्यस्मृती अभिवादन (23)

तू कळवलेल्या समाज जिवनाचे वर्णन वाचून मी या परिस्थीतीवर चिंतन मनन करण्यांत घालवून तुझ्या चैतन्य विश्वांत परिवर्तनशील वैज्ञानिक समाज जिवनाची आजची गरज या विषयी काही बाबी सुचवण्याचा निर्णय घेतला.

प्राचीन काळापासून मानवाला अन्न, वस्त्र व निवारा या प्राथमिक गरजा करिता आपला दिवस व्यतीत करावा लागत असे. परिवर्तनातून या गरजा भागवणारे स्तोत्र निर्माण होत गेले. यातूनच समाजजिवनाची एकत्र, समूहाने व नैसर्गीक कर्तव्य पद्धती बनत गेली. एकत्रीत कार्यपद्धतीच्या अवलंबनातून आपल्या समूहाकरिताच्या सीमा निश्चीत करुन आपल्या कार्यपद्धतीचे सातत्य व गरजेप्रमाणे परिवर्तनाचे मार्ग अवलंबले गेले. या निश्चीत केलेल्या सिमेतून चैतन्य विश्वांत देश निर्माण झाले. यापुढील मानव व त्याच्या कार्यपद्धतीचा इतिहास वाचतांना चिंतन, मनन, ध्यान साधना इत्यादीतून स्थानपरत्वे मानवाचे कर्तव्य ठरवण्याकरिता धर्म ही संकल्पना अमलांत आली. मानव स्वतःच्या गरजेनुसार चेतन विश्वात आपल्या धर्म संस्कारासह स्थायीक होत राहिला. म्हणूनच देशादेशात भिन्न धर्मातून भिन्न संस्कृती, प्रघात उदयाला आले.

याच परिवर्तनातून आपला भारत देश निर्माण झाला. कालांतराने आपल्या देशावरील पारतंत्र, स्वातंत्र्य संग्राम व स्वातंत्र्यप्राप्ती हा इतिहास हा आपण सर्वांनी वाचला आहे.

आता तुझ्या पत्रातील मूळ मुद्यावर मर्यादित काही उपाय सुचवण्याचा प्रयत्न करत आहे.

आपण चेतन विश्वात आज समाज जिवन अनुभवत असता सुसह्येते ऐवजी असह्यता अनुभवत आहांत. याचांच अर्थ समाजमनाला असह्यतेचा आजार झालेला आहे. हा आजार नाहीसा व्हावा अशी आपली सर्वांचीच इच्छा आहे. वैद्यकीय भाषेत आजारावर उपचार हाच उपाय आहे. उपचार करायचा असल्यांस प्रथम आजाराचे निदान करण्याची गरज असते. आपले समाजमन अनुभवत असलेल्या आजाराचे निदान करताना समाजमनाची संस्कृती, संस्कार व सवयी विचारांत घ्याव्या लागतील.

स्वातंत्र्य प्राप्ती नजरेच्या टप्प्यांत असताना सामाजिक व्यवस्था व अन्न-वस्त्र-निवारा इत्यादी सोयी गरजे इतक्या उपलब्ध नसल्याने समाज त्रस्त. शिवाय शिक्षणाच्या गैरसोयी इत्यादीमुळे अशिक्षीत, समाजांत मोजके सुशिक्षीत. पारतंत्र्यामुळे मर्यादित विकास. यामुळे विकास परिवर्तनाला वाव कमी.

स्वातंत्र मिळाल्यावर स्विकारलेल्या प्रजास्ताक राज्यपद्धतीमुळे विकासाचे नियोजन व कालमर्यादा ठरवण्याच्या वैधानिक पद्धतीतून नियोजन मंडळ व पंचवार्षीक योजना या संकल्पना अस्तीत्वात आल्या. याच माध्यामातून राज्या-राज्यातील स्थानिक विकास आराखड्यासह विकासाची नवनिर्मीती होत राहीली.

या वाटचालीत मुख्य घटक होते ते प्रामाणिक शासनाकर्ते, नियोजनकार आणि सुसंस्कारित समाज. विकासाच्या वाटचालीत या घटकांची नितांत आवश्यकता असते. तुमच्या चेतन विश्वांत सर्वच देश आपआपल्या परिने विकास करत राहीले व नवनिर्मीतीत रोज नवा आनंद मिळवत गेले. देशा-देशातील निर्मीती विकासाच्या कल्पना व कार्यपद्धती भिन्न असल्या तरी मानवाच्या प्राथमिक गरजा भागवण्यासाठी संशोधनातून मिळणारे विज्ञान शास्त्र विकसीत करुन गरजा सुसह्यतेने पु-या करु शकणा-या यंत्रणेच्या शोधाचे सातत्य अखंड ठेवले.