थोरलेसाहेब पुण्यस्मृती अभिवादन (25)

अशा परिपक्व नागरिकांचा बनलेला सुसंस्कृत समाज सामुहिक हिताचे निर्णय घेवून सहकारातून सामुहिकपणे यशस्वी करण्याची परंपरा राखून आहे.

येथील समाजव्यवस्थेचे नियमन करणारे परिपक्व नागरिकांनी पाळावयाचे नियम व कर्तव्य करण्याकरिता इकडील बहूमान्य प्रतिष्ठीतांच्या वर्षातून तीन वेळा सामुहिक चर्चासत्र आयोजित करून केलेल्या कामाचा आढावा घेवून पुढील योजना करण्याची प्रथा आहे. अशा चर्चा सत्रांत एखाद्या विषयांवर मतभिन्नता असेल तर त्यांची नोंद घेतली जाते. तथापी अंमलबजावणी सामुहिक निर्णयानुसार घेण्याची पद्धत आहे. अंमलबजावणीत मतभिन्नता नोंदवलेले सदस्य सुद्धा सहभागी असतात. या शिखर चर्चा सभांच्या बैठकीतील निर्णय या देशातील सर्व विभाग व उपविभाग यांना बंधनकारक असतात. तथापी स्थानिक गरजेनुसार त्यांना आपले स्वतःचे स्वतःच्या विभागापुरते स्वतंत्र नियम व कर्तव्य ठरवता येतात. सुसंस्कृत व सर्व नागरिकांना केंद्रस्थानी मानून नियम व कर्तव्याचे नियम करत राहिल्याने भेदभाव न होता समानता जोपासली जाते येथे उच्च-निच भेदभाव ठरवण्याची पद्धत अस्तित्वात नसून गुणवत्तेनुसार श्रेणी प्रदान करण्याची प्रथा आहे.

येथील उद्योग धंद्यातील उत्पन्नांत देशाच्या प्राथमिक गरजांकडे प्राधान्याने लक्ष दिले जाते. प्रत्येकाला श्रेणीनुसार काम दिल्याने उत्पान्नाचा दर्जा राखून उत्पादन होते व प्राप्त श्रेणीला योग्य तो मोबदला दिला जात असल्याने वापरातील मनुष्यबळ समाधानी असते. इकडेही कामगारांच्या संघटणा कामगाराइतक्याच व्यवस्थापनाच्या गरजा लक्षांत घेवून सहकार्याच्या आदान प्रदान प्रक्रियेतू सातत्य राखून आहेत. श्रेणीयोग्य कामाची संधी न मिळू शकलेला परिपक्व नागरिक इतर उद्योगांत प्राप्त श्रेणीतील लाभलेल्या सक्षमतेनुसार काम स्विकारतो व शक्य असलेली व्यक्तीगत प्रगती करतो. त्यामुळें इकडे बरोजगार नागरिक क्वचितच आढळतात. नव्हे तर उत्तम व्यवस्थापनामुळे सर्वांना श्रमाची योगदानाची संधी मिळते.

येथील नागरिक हा परिपक्व असला पाहिजे. हा कटाक्ष असल्यामुळे प्रथम प्रवेशांतच त्याचा अध्ययन आश्रम निश्चीत करून अध्ययन पूर्ण करणे सक्तीचे व सुसह्य अध्ययन आश्रमाची पूर्तता केल्यामुळे आणि अध्ययन सक्तीचे असल्यामुळे येथील परिपक्व नागरिक साक्षर असतो. त्याच्या शिक्षणाची श्रेणी त्याचे बुद्धीमत्तेवर अवलंबून असते.

इकडच्या जलसंपदेचे योग्य नियोजनाचे सातत्य राखले जात असल्याने कृषी उत्पादनातून अन्नधान्याचा मुबलक पुरवठा होत असतो. शेती धंद्यातील नागरिकांना उत्पादनाचा योग्य मोबदला मिळत असल्याने आपल्या कार्यक्षेत्रातील उत्पादनांत ते सातत्य राखून असतात.

सार्वजनीक सेवा व्यवस्थेबाबत इकडे खूपच दक्षता घेतली जाते. प्रत्येक सेवा व्यवस्थापनांत पात्र व तज्ञांची नियुक्ती केलेली असल्याने इकडच्या सेवा दर्जा उत्तम प्रतीचा सातत्य राखून असतो.

त्याचप्रमाणे येथील समाजाच्या गरजेनुसार घेतलेल्या समाजाभिमुख निर्णयानुसार करावयाच्या नवनिर्मीतीत सहकार भावनेने सामुहिक सहभागाने नवनिर्मीतीत यश मिळवतात. येथील न्यायव्यवस्थचे वैशिष्ट्ये म्हणजे वास्तवावर आधिरित न्यायाबाबत कोणत्याही स्थरावर तडजोड स्विकारली जात नाही. अन्याय झाल्याची प्राथमिक खात्री झाल्या शिवाय येथील विधीतज्ञ न्यायालयांत खटला दाखल करण्यांस परवानगी देत नाहीत. त्यामुळे येथील नागरिक न्यायव्यवस्थेत दिलेला निवाडा स्विकारून नियमीत सुसह्य जिवनांत रहातो.