थोरलेसाहेब पुण्यस्मृती अभिवादन (19)

अशा सामाजीक अवस्थेत आमच्या अनुयायी आश्रमातील सामाजीक विषयांच्या संशोधनातील अनेक विषयांचे निष्कर्ष राबवण्याकरिता आमचे साहेब कार्यरत आहेत. वास्तवाचा स्विकार करून दुरूस्ती करण्याचे उपाय राबवण्याचा कार्यक्रमांत ते नेतृत्व करत आहेत. तथापी तुमच्या काळांत नेतृत्वाला मिळणारा एकसंघतेची साथ आज त्यांना मिळण्यास कठीण जात आहे. तरीही खचून न जाता कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी ते अविरत कार्यरत आहेत. त्यांना आता सर्वांची साथ हवी आहे. साहेबांना साथ देण्याकरिता अनुयायी आश्रमातील अनेक जेष्ठ अनुयायी यापुर्वीच आश्रमातून बाहेर पडले असले तरी काहीजण व्यक्तीगत मोह पाशामुळे या कार्यक्रमापासून वेगळे झाल्याचे पहावयांस मिळत आहे.

आपल्या अनुयायी आश्रमातील अनुयायांचे अध्ययन पुर्वी प्रमाणेच प्रभावीपणे कार्यरत राहण्यासाठी साहेबांचे अखंड लक्ष असतेच. आपल्या स्थलांतरा नंतर केवळ राज्यातील व देशातील समाजीक गरज म्हणून साहेबांनी आपणासह अनेकांना फारकत घेण्यांस भाग पाडलेल्या मूळ मठाशी कार्यसंबंध कार्यरत करुन आर्दश कार्यपद्धतीचा पाठपुरावा करण्यांत मग्न राहिले. तथापी मूळमठातील प्रस्थापीतांना साहेबाच्या कार्यपद्धतीने समाजांत व्यक्तीगत साहेबच लोकपसंतीला उतरतात व समाजमनांत साहेबांचा प्रस्ताव प्रथम पसंतीचा ठरतो ही बाब साहेबांबद्दल व्यक्तीगत दुःस्वास वाढत रहाण्यास कारणीभूत होत राहिली. मूळ मठाच्या प्रस्तापीतांच्या सुमार कार्यपद्धतीला आजवर मिळत असलेल्या कार्यसंबंध खंडीत करून आपल्या अनुयायी आश्रमाच्या माध्यामातून समाजाभिमुख व परिवर्तनशील विज्ञानयुगांला सामोरे जाणारे स्वतंत्र विचार दिले. आपल्या अनुयायी आश्रमातील समाजाभिमुख शिकवणूकीचा वारसा लाभलेले आमचे साहेब आज शेतीसाठी व शेतक-यांसाठी सतत जागृत राहून वास्तवाशी फारकत न घेता धडपडणारा नेता, साहित्य-संस्कृती व इतिहासाची जाण असलेला नेता, मराठी विषयी आस्था असणारा नेता, विज्ञान प्रेमी व अभ्यासू नेता, खेळ स्पर्धेतील कुशल किक्रेट प्रशासक, राज्याच्या सर्वस्थरातून ज्ञात असलेला नेता, चेतन विश्वांत सर्वांना कुतूहल असलेला नेता, निगर्वी, संयमी, विवेक व विचारांशी अखंड साथ करणारा नेता अशा विविध रुपात समाजमनांत स्थान मिळवले आहे. मनोधैर्य व संयम ही साहेबांची शक्ती आहे हे चेतन विश्वांत सर्वमान्य झाले आहे. आपल्या अनुयायी आश्रमाची वाटचाल व अध्यनातील परिवर्तन हे विज्ञान युगाशी व्यवहार्य बदल स्विकारत पुर्वी प्रमाणेच समाजातील अव्वल श्रेणीक्रम राखून आहे. साहेब प्राप्तपरिस्थितीवर अविरत प्रयत्नशिल आहेत. तथापी प्रचलीत अप्रीय सामाजीक व्यवस्था दुरुस्तीच्या कामांत अनेक अडथळे येत आहेत.

पत्रांत नमूद केलेली सामाजीक प्राप्तपरिस्थीती पहाता माझ्या सारख्या अनुयायी आश्रमातील प्रशिक्षण पूर्ण केलेल्या अनुयायाने सामाजिक विकास परिवर्तनाला गती देणा-या कोणत्या कार्यक्रमाला प्राधान्य द्यावे जेणेकरून माझे योगदान प्रभावी ठरेल. सामाजीक, आर्थीक, शिक्षण, शेती, रोजगार, नवनिर्मीती यातील कोणता कार्यक्रम प्राधान्याने कार्यरत केल्यास इतर कार्यक्रमाला पूरक ठरेल याबाबत आपले मार्गदर्शन मिळावे ही नम्र अपेक्षा.

आपले मार्गदर्शन प्राप्त झाल्यावर आपल्या अनुयायी आश्रमातून प्रशिक्षण घेवून प्रशिक्षीत झालेल्या व आज प्रशिक्षण घेत असलेल्या अनुयायांच्या एकत्रीत महासभेत मांडून अंमलबजावणीच्या गठीत समीतीच्या माध्यामातून प्रारंभ करता येईल.

उत्तराच्या अपेक्षेत

आपला आज्ञाधारक
धाकट बाळ.

 

अनुयायी आश्रमातील प्रशिक्षण पूर्ण करून आपले कर्मकर्तव्य पार पाडण्याकरिता समाजांत समाजाभिमुख कार्यक्रमांचे तपशील विषद करतांना प्रबोधनांतील कोणत्या विषयाला प्राधान्य द्यावे या स्व. यशवंतरावजींनी अनुयायी आश्रमातील अनुयायांस सूचनेच्या सवरूपांत मार्गदर्शन केले आहे. स्व. यशवंतरावजींनी मार्गदर्शन करताना प्राचिन व त्यानंतरच्या समाज जिवनाची रचना व व्यवहार याची माहीती सांगतानाच सुसंस्कृत नागरिक व सुसंस्कृत समाजच आपला विकास सुसह्य जिवनाकरिता उपयुक्त करतो हे सांगीतले आहे. स्व. यशवंतरावजीनी आजच्या कार्यरत नागरिकाला व तरूण पीढीला देशातील प्रत्येकाने स्वतःता कोणत्या कर्तव्याची जाण ठेवली पाहिजे हे सांगून अनुयायी आश्रमांतील अनुयायानी कोणत्या कार्याला प्राधान्य द्यावे असे मार्गदर्शन करणारे पत्र पाठवले आहे. याच पत्राचा बोध आजच्या व उद्याच्या सर्वांनी घेण्याकरिता सादर करत आहे.