थोरलेसाहेब पुण्यस्मृती अभिवादन (16)

येथील सद्यसामाजीक परिस्थितीचा विचार करता माझा पत्र प्रपंच लांबत रहाणार आहे. या माध्यमातून माझ्या शंका व अपेक्षा स्वैरपणे लिहीण्याची-मांडण्याची मी संधी घेणार आहे. आपणही आपल्या पत्रातून आपले मार्गदर्शन खुलासेवार कळविण्याची प्रचिती द्याल ही अपेक्षा. अस्तीत्वात असलेल्या महाराष्ट्राचे भावनात्मक ऐक्य, आर्थीक विकास यावर महाराष्ट्राचे भवितव्य अवलंबून असल्याचे आपण आम्हाला सांगीतले होते.

महाराष्ट्रातील विशिष्ट परिस्थिती, महत्वाच्या समस्या मांडून आर्थिक, शैक्षणीक व सांस्कृतीक विकासाच्या दिशा इत्यादी बाबत प्रगतीचे टप्पे आपण सांगीतलेत. याच बाबत उत्तम प्रशिक्षाणार्थीची फौज निर्माण करण्याकरिता आपण अध्ययनाची सोय सर्वपातळीवर करुन त्या त्या ठिकाणी निर्णय घेण्याचे व आपला विकास करण्याचे अधिकार स्थानिक पातळीवर देऊन समाज सेवकांची फौज निर्माण केलीत. नवमहाराष्ट्राच्या निर्मीतीकरिता आपल्या मार्गदर्शनातून झालेल्या विकास कार्याचे सातत्य राखण्याकरिता आपल्या अनुयायी आश्रमात झालेले संशोधन कार्यरत ठेवण्याच्या कार्यक्रमाला प्राधान्य द्यावयाचे आहे. या करीता सामाजातील कार्यकारी अधिका-यांच्या अंमलबजावणीतून परिपूर्णता पडताळण्याची व गरजेच्या ठिकाणी दुरुस्ती सुचवण्याची कामगीरी पार पाडावयाची आहे. या कामगीरीवर अनुयायी आश्रमातून बाहेर पाडल्यावर प्रथम स्वैर परंतू मुक पहाणीत हे काम करण्याकरिता समाजातून अपेक्षीत सहाकार्याबद्दल मला बरीच विसंगती आढळल्याने माझे मन बैचेन झाले. वास्तविक आमचे महाराष्ट्र राज्य देशांत सर्व क्षेत्रांत अग्रगण्य राज्य म्हणून गणले गेले होते. तथापि माझ्या मुक पाहणीत राजकीय व प्रशासकीय स्थरावर अपप्रवृत्तीचा प्रभाव वाढून वितंडवाद, भष्ट्राचार, विध्वंस, दहशतवाद, जाती जातीतील तेढ आणि स्वार्थी प्रवत्ती यामुळे लोकशाहीचे नांव घेत महाराष्ट्राचा समाजपुरूष वैफल्यग्रस्त अवस्थेत पहावयांस मिळत आहे. साहेब, महाराष्ट्राची ही अवस्था सांगताना आमच्या देशाचीही स्थिती वेगळी नाही हे सुध्दा जाणवते. तुम्हा मंडळीनी गुलामगीरीचे हाल आणि स्वातंत्र्याचे मोल समाजाला पटवून दिलेत व एकसंघतेने स्वातंत्र संग्रामाला कार्यक्रम दिलांत. अनेकांच्या त्यागातून, आहूतीतून स्वातंत्र मिळवलेत. २० व्या शतकातील स्वातंत्र प्राप्ती नंतरचा काळ आमच्या पीढीला प्रेरणादायी ठरला. आपण आपल्या सहकार्याच्या मदतीने नियोजन केलेल्या कार्यक्रमाचे सातत्य राखून आम्हाला पदोपदी नव्या वाटा व नव्या दिशा दाखवून उद्याचा महाराष्ट्र व उद्याचा भारत यात आमची भूमिका सांगीतलीत. तीच भूमीका घेवून तुमच्या काळात तुम्हाला मिळत असलेले समाजातील सहकार्य व आज आम्हाला हवे असलेले सहकार्य यात खूपच विसंगती वाटते. साहेब, तुमच्या पीढीने २० व्या शतकात आम्हाला प्रगतीशील परिवर्तन कसे करायचे याचा प्रत्यय दिला म्हणूनच २० व्या शतकाची आठवण होते.  

२० व्या शतकांत लोकमान्य टिळकांपासून म. गांधी पर्यंत आणि सुभाषचंद्र बोसपासून प. नेहरु पर्यंत उतूंग व्यक्तीमहत्वाची मालीकांच दिपमाळे प्रमाणे प्रज्वलीत झाल्याचे आम्ही पाहीले. या शतकांत महायुद्धे झाली व देश पुन्हा उभे राहिले. या शतकांत अणूबांबने बेचिराख झालेले हिरोशिमा फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा प्रगतीच्या प्रांगणांत झेपावले. यां शताकांत अणू उर्जा अवतरली. यां शतकांत बर्लीनची भींत पाडून बर्लीनचे तुकडे जोडले गेले व बलाढ्य रशियाचे तुकडे झाले. या शतकांत आपल्याला स्वातंत्र मिळाले. या शतकांत भारताच्या विशाल लोकशाहीचा पाया घातला गेला. आपण स्वातंत्र्याचा सुवर्णमहोत्सवही याच शतकांत साजरा केला. विज्ञानाचा विकास झाला व आपण आकांशात झेप याच शतकांत घेतली. खगोल शास्त्रतले बाराकावे समजण्यासाठी जंतरमंतराच्या जागी नेहरू तारांगण याच शतकांत उभे राहीले. याच शतकांत सांर जग इंटरनेटच्या रुपाने आपल्या वीतभर मुठीत आले. मानवाच्या सुखी समृद्धी जिवनाचा ठेवा समाजाला दाखवणारे सुसंस्कृत समाजसुधारकही याच शतकांत पाहिले. सहिष्णूता ही भारताची प्राचीन संस्कृती सांभाळणारे आम्ही जो-जे बांछील ते-तो लाहो ही प्रार्थना याही शतकांत अखंड ठेवली. देशाच्या अस्मीतेचा विचार स्वराज्यांत परिवर्तीत होतो हे याच शतकांत अनुभवले. प्रादेशीक अस्मीतेची ऐतिहासीक एकजूट संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतून याच शतकांत अनुभवली.