थोरलेसाहेब पुण्यस्मृती अभिवादन (11)

“साहेब” आपल्या कर्तव्यमोहीमेत इतके व्यस्त असतात की, कर्तव्यमोहीम पार पाडत असता, त्यांना मिळणा-या आनंदापेक्षा मोहीमेतील अडथळे दूर करण्यांतच त्यांना फार कष्ट पडत आहेत. तुमच्या शिकवणूकीप्रमाणे ध्येयसाध्यतेसाठी अडथळ्याची तमा न बाळगता कार्यरत रहावे याची आठवण ठेवून त्यांनी ही बाब आपणांस कळविली नसणार. परंतू मी आता ठरविलेच आहे की, अध्ययन पूर्ण करून गेलेले, अध्ययन चालू असता सांप्रत मोह पाहून अध्ययन निम्यात सोडून गेलेले तरीही आपल्याच आश्रमाचा वारसा सांगणारे अनुयायी आज प्रत्यक्ष भारतमातेसाठी काय करत आहेत ? हे तुमच्या कानावर घालायचे. तरुणांनी शिक्षण घेतल्यावर ते बंड करतील ही भिती बुध्दीवादांनी आपणाकडे व्यक्त केल्यावर तुम्हीच सांगीतले होते ना, “की तरुण सुशिक्षीत झाला व त्याने बंड केले तरी ते देशाच्या प्रगतीसाठीच असेल. शिक्षण रोखणे म्हणजे देश प्रगतीला खीळ घालण्यासारखे होईल. “थोरले साहेब” तुमच्या कृपेने मी थोडासा शिकू शकलो. मग मीही तसा सुशिक्षीत नाही का ? माझे थोडेसे बंडच समजा ना ! बंड करुन तुमची परवानगी मीळवायचीच असा मी निर्धार केलेला आहे. निर्धार करणारी उद्याची पीढी निर्माण झाली पायजेलाय हे तुम्हीसुध्दा मान्य कराल असा विश्वास आहे.

केवळ एक शंकाखुलासा व मार्गदर्शन मागण्याकरिता आपलं लहानपण न विसरल्यामुळे मी पत्राद्वारे मागत असलेली परवानगी द्यावी ही पुर्णपणे नम्र परंतू पुर्णपणे आग्रही विनंती.                  

अभिवादन.

आपला आज्ञाधारक

धाकटा बाळ


स्वातंत्र्य प्राप्तीच्या संधीकाळात जन्म लाभलेल्या पीढीने स्वातंत्र्य संग्रामातील स्वातंत्र्य सैनीकांचा त्याग व कष्ट ऐकले. म्हणूनच स्वातंत्रदिन, प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य सैनिकांचे स्मृतीदिन साजरे करताना सतत राष्ट्रप्रेमी संकल्पना करून अंमलात आणण्याचा निर्धार केला. राज्य व देश विकासांत आमच्या पाढीने पुढाकार घेवून राज्य व देश विकासांत सहभाग घेतला. यामुळेच राज्यांत व देशात स्वातंत्र्यप्राप्तीनंतर विकासाचा सुवर्णकाळ अवतरला. तथापी या विकास व परिवर्तनाच्या वाटचालीत देशप्रगतीला विघातक प्रवृत्तीच्या गृहणाचा स्पर्ष होवून आपण प्रजासत्ताक राज्यपध्दतीचा स्विकार करून करत असलेल्या प्रगतीच्या वाटचालीत अडथळे येवू लागले. स्व. यशवंतरावजींना मार्गदर्शन मागणा-या दि. २५-११-२०१० च्या पत्राला त्यांनी त्यांच्या अनुयायास पाठवलेल्या पत्राद्वारे मार्गदर्शन करण्याची परवानगी देणारे पत्र सादर करत आहे.