थोरलेसाहेब पुण्यस्मृती अभिवादन (9)

धाकटा बाळ
अनुयायी आश्रम, विरंगुळा परिसर,
कृष्णा काठ, कराड, जि. सातारा,
महाराष्ट्र, भारत.
पि. – ०२५०११०१९८५०
दिनांक : २५-११-२०१०


प्रति,
वंदनीय सर्वपीतृ प्रमुख ‘साहेब’
“विरंगुळा” इंद्रप्रस्थनगर,
कराड आळी, कृष्णाकाठ शेजारी,
जि. ध्रुवतारा, तारांगण महाराष्ट्र,
नभांगण भारत,
पिन कोड नं. ०१९८५०२५०११.
    
पुण्य स्मृतीस अभिवादन,

आज हे छोटेसे पत्र आपल्यापुढे अभिप्रायासाठी असलेल्या असंख्य देशातील, अनेक क्षेत्रातील मान्यवरांच्या असंख्य प्रबंधांच्या ढीगांत आपल्या स्पर्शाची व नजरेची प्रतिक्षा करत असणार ही या आपल्या अभ्यासीकेतिल स्थितीचा मुखपट माझ्या डोळ्यासमोर वारंवार येत आहे. हे पत्र उघडून वाचायला सुरुवात करण्यापूर्वी आपणांस काय वाटेल याबाबतची माझी कल्पना माझ्या मनपटलावरुन सरकत आहे. या नमूद केलेल्या कल्पना ख-या असल्याबद्दल आपण मला पुढील पत्रांत कळवाल असा मला विश्वास वाटतो.

वर नमूद केलेल्या माझ्या मनांतील कल्पनांपैकी मोजकी परंतू प्रमुख बाब जाता-जाता सांगतो व पुढील पत्र प्रपंच समोर ठेवतो. हे पत्र आता आपल्या हातांत आहे. पत्र कोणी पाठवले आहे हे आपण प्रथम पहाता आहांत. यावर प्रेषक : धाकटा बाळ, अनुयायी आश्रम, विरंगुळा परिसर, कृष्णाकाठ, कराड इतकेच वाचल्यावर आपण प्रत्यक्ष पत्र वाचायला सुरवात केली आहे. आणि खरंच आहे म्हणा ! या आमच्या अनुयायी आश्रमातील प्रत्येक सेवकाने आपले अध्ययन कशा प्रकारे सुरु ठेवले आहे यावर आपण इथल्या वास्तव्यात जीतके लक्ष देत असत व मार्गदर्शन करत असत हे ध्यानांत घेता उद्याचा ‘शक्तीशाली भारत’ या तुमच्या कल्पनेला पुरकता देण्याला या आश्रमातील प्रत्येक अनुयायी उपयुक्त ठरणार आहे हे आपण जाणून होता. तुम्हाला प्रिय असलेला व इथल्या वास्तव्यात देशसेवा म्हणजे नेमके काय याचा वास्तूपाठ देताना आपण या अनुयायी आश्रमावर फार प्रेम केलेत व त्यासाठी आपल्या कर्तव्यकार्यांतून जाणीवपूर्वक वेळ दिलात. आमच्या या अनुयायी आश्रमाला आपण घालून दिलेल्या प्रथेप्रमाणे इथले अध्ययन संपल्यावर “तुमच्या महाराष्ट्राला, तुमच्या उद्याच्या शक्तीशाली भारताकरिता” ठरलेली उज्वलता वास्तव्यात आणण्याचे मार्ग अवलंबण्याकरिता प्रत्येक परिपूर्ण अनुयायांनी आश्रमातून बाहेर पडण्याची प्रथा आपल्या इथल्या वास्तव्यात सुरु होती तशीच आजही सुरु आहे. मी अनेक जाणत्या अनुयायाबरोबर बोटाला धरुन अंगावरच्या अपु-या कपड्यांत या आश्रमांत वावरतांना वयाने लहान असल्यामुळे “जरा वय वाढल्यावर येथे ये” म्हणून अनेकाकडून ऐकूनही येथेच घुटमळत रहात असे. मला अध्ययनक्रम योग्य वयात सुरु करता आला व आज मी इथला सर्वांसारखाच एक अनुयायी म्हणून अध्ययन करत आहे. असो. अनुयायी आश्रमातील बारीकसारीक बाबींची तुम्हाला आठवण करुन देण्याचा मी अकारण मजकूर प्रस्तृत करत आहे. कारण यातील इंतंभूत माहीती तुम्हाला आहे कारण हा उपक्रम तुम्हीच राबवलांत व तो आमच्यासाठी ठेवला आहांत. म्हणून “नमनाला घडाभर तेल” ही उक्ती वापरुन आपण सर्व अनुयायांना भानावर आणत याची आठवण ठेवून मी आता माझ्या मुख्य पत्रहेतूकडे वळतो.