थोरलेसाहेब पुण्यस्मृती अभिवादन (12)

यशवंतराव चव्हाण
“विरंगुळा” इंद्रप्रस्थनगर,
कराड आळी, कृष्णाकाठ शेजारी,
जि. ध्रुवतारा, तारांगण महाराष्ट्र,
नभांगण भारत,
पिन कोड नं. ०१९८५०२५०११०.
दिनांक : ५ डिसेंबर २०१०

प्रति,
चि. धाकटा बाळ
यांस अनेक आशीर्वाद                      
    
तुझे दिनांक २५ नोव्हेंबर २०१० चे पत्र मिळाले. मजकूर समजला. तुझ्या या पत्राला उत्तर द्यायचेच व यापुढे तुझ्या प्रत्येक पत्रातून व्यक्त होणा-या शंका निरसन करण्याचा व यथाशक्ती मार्गदर्शनयुक्त सूचना करण्याचा मी जाणीवपूर्वक निर्णय घेतला आहे. तुझ्या पत्राला उत्तर लिहिण्याची सुरुवांत करण्यापुर्वी या पत्र प्रपंचाद्वारे गेल्या २५ वर्षापासून न मिळालेली संधी घेण्याचा मी विचार केला व तो फलद्रुप होत आहे या प्रसंगाने आज मी नेहमीपेक्षा आनंदात आहे.

धाकट्या बाळा, आज तारीख ५ डिसेंबर माझे पत्र तुझ्या हाती पडण्यांस आणखी किमान सांत दिवस लागतील. म्हणजेच दिनांक १२ डिसेंबरला हे पत्र तुझ्या हाती नक्की पडेल. तू सुध्दा माझ्या पत्राची वाटच पहात असणार याची मला खात्री आहे. पत्र हाती पडताच हा लिफाफा फोडून वाचण्यासाठी तू आतूर असणार याची सुध्दा खात्री आहे आणि मलाही तेच हवे आहे. या विचारांत असतानाच मी तुम्हा सर्वांच्या सानिध्यांत असताना आपण सर्वजण मिळून १२ डिसेंबर हा दिवस मोठ्या आनंदात व उत्साहात घालवताना आपल्या अनुयायी आश्रमाचे त्यावेळचे जेष्ठ अनुयायी व आजचे प्रमुख कारभारी यांचा जन्म दिवस थोरामोठ्यांच्या भरभरुन आशिर्वादाने व सर्व अनुयायांच्या शुभेच्छा सादरीकरणांतच जात होता. असेल तेथून व शक्यतो प्रत्यक्ष भेटून मी सुध्दा आशिर्वाद देण्यांस विसरत नव्हतो. नैसर्गीक स्थलांतरा नंतर आठवणी करण्यापलीकडे कोणीच काही करु शकत नाही. हा निसर्गाचा नियम अप्रीय असला तरी सर्वांना स्विकारावाच लागतो. पण आज मात्र तुझ्या पत्राला उत्तर देण्याचे कर्तव्य पार पाडताना आपल्या अनुयायी आश्रमातील कारभा-यांस “तुम्हा सर्वांच्या साहेबास त्यांच्या कर्तव्य कार्यांत सामर्थ्य लाभावे हा आशिर्वाद कळवत आहे” आज १२ डिसेंबर असणार व म्हणूनच तूं तुझे “साहेब” जेथे असतील तेथे माझा आशिर्वाद पोहचता कर. तू तुझ्या सर्व सहका-यांच्या सामुहिक निर्धार बैठकितही तुझ्या साहेबांना त्यांच्या कामांत नेहमी साथ देण्याचा प्रस्ताव पारीत करुन घे. मी तर नेहमी प्रमाणे पुन्हा सांगतो की, यातच तुमचे, तुमच्या राज्याचे, तुमच्या देशाचे व नव्या पीढीचे कल्याण आहे. अर्थात हे मला ५० वर्षांपुर्वीच उमजले होते व म्हणूनच मी तुम्हा सर्वांना नेहमी तेच सांगत आलो. माझ्या पत्राचा पुढील भाग वाचण्यापूर्वी तू प्रथम मी कळवलेला आशिर्वाद पोहचता कर. मला माहित आहे तूला अडचण जाणवते ती तुझ्या साहेबापर्यंत पोहचण्याची. पण तुला आठवण करुन देतो की, पंढरपूरला जाणा-या वारक-याला पांडूरंगाचे दर्शन घेताना वशीलेवाल्यास दडग्या दरवाजाने प्रवेश मिळत होता तरीही निश्चींम वारकरी भक्त हे वाळवंटापर्यंतच्या रांगेतून दिर्घ प्रतिक्षे नंतर पांडूरंगाचे दर्शन घेतल्यावर पांडूरंगाच्या दर्शनाने कृतकृत्य होत असत. तसाच तू वशीला न लावता “कारभा-या” पर्यंत पोहचलास व माझा हा आशिर्वाद पोहचता केलास तर तुला तोच आनंद होईल जो निस्सीम वारकरी भक्ताला होत असे.