व्याख्यात्यांचा परिचय
डॉ. रावसाहेब कसबे
जन्म : १२ नोव्हेंबर १९४४, औरंगपूर, ता. अकोले, जि. अ. नगर
शिक्षण : सर्वोद्य विद्यामंदिर राजूर व मॉडर्न हायस्कूल, अकोले तसेच महाविद्यालयीन शिक्षण अहमदनगर व संगमनेर येथील कॉलेज मधून. एम्. ए. राज्यशास्त्र, मराठवाडा विद्यापीठात सर्व प्रथम (सर्व शिक्षण मोलमजुरी व नोकरी करून पूर्ण)
पी.एच्. डी. पुणे विद्यापीठ.
नोकरी : सुरवातीस काही दिवस औरंगाबाद येथे व १९७३ पासून संगमनेर महाविद्यालय, संगमनेर येथे राज्यशास्त्राचे प्राध्यापक गेली १५ वर्षे महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर विविध ठिकाणी समाज प्रबोधनाच्या दृष्टीने व्याख्याने. अस्मितादर्श, समाजप्रबोधन पत्रिका, नवभारत, निकाय इत्यादि नियतकालिकांतून सातत्याने सामाजिक, राजकीय व वाङमयीन विषयांवर वैचारिक लेखन. महाराष्ट्रातील तरूण विचारवंतांतील डॉ. रावसाहेब कसबे हे एक आहेत.
प्रकाशित ग्रंथ संपदा—
१) 'झोत’ ( या पुस्तकाच्या ४ महिन्यात ३ आवृत्त्या प्रसिध्द )
२) ‘दलित चळवळीची वाटचाल’
३) ‘आंबेडकर आणि भारतीय राज्यघटना’
४) ‘आंबेडकर आणि मार्क्स’
५) ‘आंबेडकरवाद’
आगामी
१) भारतीय संविधानाचे स्वरूप आणि डॉ.आंबेडकरांची भूमिका
२) बुध्द—मार्क्स आणि आंबेडकर ’
३) धर्म आणि इतिहास लेखन
‘आंबेडकर आणि मार्क्स ’ या ग्रंथास प्रियदर्शनी अँकेडमी आणि महाराष्ट्र साहित्य परिषद यांचे पुरस्कार प्राप्त.
फेब्रुवारी १९८७ मध्ये सोलापूर येथे झालेल्या अखिल भारतीय दलित साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे.