विरंगुळा - ८२

किंमतीचा प्रश्न आणि डेफिसिट फायनान्स ही एकाच नाण्याच्या दोन बाजू. डेफिसिट फायनान्सवर काबू मिळविणे हे यापुढचे महत्त्वाचे लक्ष्य आणि अर्थनीतीचे सूत्र राहिले पाहिजे.

या वर्षीच्या शासकीय कामातील गोष्टी नमूद करावयाच्या झाल्यास पुढील गोष्टी डोळ्यापुढे येतात. महाराष्ट्र - शासन - प्रशासन ही महत्त्वाची समिती पंतप्रधानांनी माझ्या अध्यक्षतेखाली नेमली. या वर्षी काही महत्त्वाचे अहवाल तयार झाले आहेत. हे काम लवकर पुरे व्हावे असा माझा प्रयत्न आहे. शिवाय आर्थिक मदतीबाबतचा अहवाल मूलगामी फरक करणारा ठरावा. पंतप्रधानांनी अजून निर्णय घेतलेला नाही. (२) फॉरिन एक्स्चेंज रेग्युलेशन ऍक्टची महत्त्वाची अट, रिझर्व्ह बँकेच्या अखत्यारीतून स्वतंत्र करून या कायद्याची नव्याने रचना करण्याच निर्णय आणि लोकसभेत बील सादर केले. वित्तसंस्थांच्या इतिहासातील हे एक महत्त्वाचे पाऊल. (४) फिस्कल हा एक विभाग बनवून क्रियाशील बनवला आहे. या सेवेची उणीव होती. १९७४ च्या बजेटच्या वेळी याचे महत्त्व समजून येईल. (५) फायनान्स कमिशनचा रिपोर्ट आता राज्यांच्या बाबतीत उदार धोरण आहे. केंद्राच्या वित्तसाधनांवर बराच ताण पडणार. तथाकथित मागासलेल्या राज्यांना खूपच मदत होणार. शिफारशी जशाच्या तशा स्वीकाराव्यात हा महत्त्वाचा आग्रह होता. पंतप्रधानांनी काहीसे आढेवेढे घेतले. एका चर्चेच्या वेळी दक्षिणेकडील राज्यांना सगळा फायदा मिळतो, उत्तरेकडील राज्यांना मी कसे तोंड देऊ असे उद्गार त्यांनी काढले.

वस्तुत: उत्तरेकडील राज्यांना फार कमी जास्त असे नाही, भरपूर दिले आहे. (६) पाचवी पंचवार्षिक योजना तयार झाली ही महत्त्वाची घटना आहे. याबाबतीत पुष्कळ काही सहकार्य मिळाले. त्यांना 'एन्. डी. सी.'नेही उल्लेख केला. (७) बँकिंग डिपार्टमेंटच्या क्षेत्रात 'सेपरेशन ऑफ आय डी बी आय, फ्राम आर बी आय, डिस् कंटिन्यूएशन; बील सादर केले.' (८) परदेशी पाहुणे ब्रेझनेव्ह यांची भेट ही या वर्षाची महत्त्वाची घटना. चर्चेमध्ये सामील होण्याची संधी मिळाली. त्यांचे सादरीकरण (प्रेझेंटेशन) ही बलस्थान होते. 'अ' वर्गात प्लॅनिंगचे प्रश्न किती अनिश्चित असतात त्याचे त्यांनी प्रामाणिक वर्णन केले. शेतीचे प्रश्न किती अवघड असतात तेही मनमोकळेपणाने सांगितले. आपल्या अनुभवावरून त्यांनी एक गोष्ट सांगितली. आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये राष्ट्रांच्या वैयक्तिक संबंधास फार महत्त्वाचे स्थान आहे. ते प्रयत्नपूर्वक चांगले बनवले पाहिजेत. असा त्यांचा वडिलधाऱ्या प्रमुखांचा त्यांना सल्ला मिळाला.

सी २०च्या एका फ्रेंचाशी माझी भेट व दाट ओळख झाली. दोन दिवसांसाठी जे खास निमंत्रित होते. माणूस मोठा बुद्धिमान वाटला. आंतरराष्ट्रीय संबंध प्रयत्नपूर्वक सुधारण्याची आवश्यकता आहे यावर त्यांनी भर दिला. दोन-तीन पिढ्यांपूर्वी त्यांच्या कुटुंबात पत्नीच्या बाजूने हिंदी रक्त आले असून हे त्यांच्या मुलाचे डोळे पाहिल्यावर तो हिंदी आहे असे वाटले. विशेष म्हणजे त्यांनीच याचा खुलासा केला. माझी हिंदुस्थानात येण्याची फार दिवसांची इच्छा होती हे त्यांनी आवर्जून सांगितले.