आमचे मुख्यमंत्री -९४

मनोहर जोशी हे धारावी-दादर भागातून निवडून आलेले होते. त्यांनी मुंबईकरता उड्डाणपूल व मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग कार्यान्वित केला. झोपडपट्टीवासीयांना मोफत घरे देण्याची योजना आखली. धारावी स्लम्सचे स्वच्छीकरण करण्याची मोहीम हाती घेतली. झुणकाभाकर योजना सुरू केली. मुंबईत जागोजागी सुलभ स्वच्छतागृहे बांधवून घेतली. त्यांनी स्मार्टपिटीची योजना सुरू केली. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाला ५० लाख रुपयांचे अनुदान शासनाकडून देण्याचे जाहीर केले.

नारायण राणे हे अल्पकाळच मुख्यमंत्री होते. ते मालवण मतदार संघातून निवडून आले होते. जिजामाता आधार योजना, बळीराजा संरक्षण योजना ह्यांना त्यांनी चालना दिली. स्त्रियांत औद्योगिक शिक्षणाची आवड निर्माण करण्याकरता त्यांनी स्त्रियांना अशा संस्थामध्ये मोफत शिक्षणाची सोय केली.

विलासरावांच्या कारकिर्दीत अनेक समस्या आहेत. त्यांनी ग्राम अभियान व संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियानाच्या कार्याला चालना दिली. संगणकीकरण व माहिती तंत्रज्ञान ह्यांच्या शिक्षणाला उत्तेजन दिले. लोकसंख्येचे नियंत्रण करण्याकरा त्यांनी जनजागृतीची मोहीम आखली. सुदैवाने ते आजही अधिकारपदावर आहेत व त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत.

सुशीलकुमार शिंदे फारच अल्पकाळ मुख्यमंत्री होते. ते सोलापूर मतदार संघातू निवडून आलेले होते. ह्या अल्पकाळात त्यांनी सोलापूर विद्यापीठ स्थापण्यात पुढाकार घेतला. सोलापूरकरता त्यांनी तुळजापूर-सोलापूर रस्त्यावरील हलगर गावात आश्रमशाळा सुरू केली. सोलापुरातील सिव्हील हॉस्पिटलचा विस्तार केली. सोलापूरला कामगार विमा रुग्णालय स्थापन केले. तेथे विमानतळ उभारला. आकाशवाणी केंद्र सुरू केले. औद्योगिक वसाहतीची उभारणी केली. शेठ हिराचंद विद्यालयाचा विस्तार केला. स्मशानभूमीचा कायापालट केला. सोलापूरच्या पाण्याचा प्रश्न सोडवला. सोलापूरात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दूरध्वनी सेवा उपलब्ध करून दिली.

एक म्हण आहे की If wishes were horses beggars would ride on them. त्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांच्या मनात स्वतःच्या मतदारसंघात अनेक गोष्टी करण्याची इच्छा असली तरी त्यांच्या पदामुळे त्यांच्यावर इतक्या मर्यादा पडतात की त्यांना स्वतःच्या मतदार संघाकरता फारसे काही करता येत नाही. शिवाय महाराष्ट्रात मुख्यमंत्र्याची कारकीर्द इतकी अनिश्चित असते की मतदारसंघाचा विचार करण्यास अवधीच सापडत नाही. त्याचबरोबर असा विकास करण्याचा थोडा जरी प्रयत्न झाला की तो मुख्यमंत्री टीकेचा विषय होतो. ह्या संदर्भात शंकरराव चव्हाणांवर झालेली टीका अनेकांना आठवत असेल. म्हणूनच मुख्यमंत्र्याच्या कारकिर्दीचे मूल्यमापन हे त्याने महाराष्ट्राकरता काय केले ह्यावरच ठरविले पाहिजे. विशिष्ट मतदारसंघाचा विकास हा एकूण महाराष्ट्राच्या विकासातच अंतर्भूत आहे. त्यातूनच विकासाचा झरा त्या त्या मतदारसंघात झिरपतो.

महाराष्ट्राचा नकाशा पाहण्यासाठी नकाशा वर क्लिक करा (नकाशा)