समग्र साहित्य सूची १४९

प्रकाशित साहित्यसंपदा :

१)  'डयुई दशांश वर्गीकरण पद्धत' १९६६ मध्ये प्रकाशित

२)  'यशवंतराव विचार व वारसा' सहकार्याने १९८९ मध्ये प्रकाशित (आवृत्ती संपली)

३)  'यशवंतराव चव्हाण विविधांगी व्यक्तिमत्त्व' हे पुस्तक १९९४ मध्ये प्रकाशित

४)  'यशवंतरावांच्या प्रस्तावना' हा संपादित ग्रंथ १९९८ रोजी प्रकाशित (आवृत्ती संपली)

५)  महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण  - २००२ प्रकाशित

५)  'ग्रंथालयीत संदर्भ सहाय्य', 'यशवंतरावाची मानपत्रे' व 'यशवंतराव चव्हाण समग्र साहित्य सूची' ही तीन पुस्तके प्रकाशनाच्या मार्गावर.

६)  विविध प्रकारच्या संस्थांच्या, अमृत, सुवर्ण व हीरक महोत्सवी स्मरणिकांचे संपादन कार्य ( पंचवीस स्मरणिका)

मानसन्मान :

१)  'डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालय पुरस्कार' प्राप्त शासनातर्फे ग्रंथपालाचाही गौरव.

२)  'ग्रंथाली वाचक चळवळ' महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचा महाराष्ट्र राज्यातील उत्कृष्ठ ग्रंथपालाला दिला जाणारा 'प्रा.वसंतराव वरखेडकर आस्थेवाईक ग्रंथपाल पुरस्कार' १९९२ (ग्रंथ  - ग्रंथपालन, ग्रंथालयीन सेवा, ग्रंथालय चळवळ व ग्रंथ प्रसार इ. कार्यासाठीचा) हा मानाचा पुरस्कार प्राप्त.

३)  स्वा. वीर दादा उंडाळकर स्मारक समिती  - उंडाळे ता. कराड यांचा 'सामाजिक व ग्रंथालयीन' उत्तम सेवेबद्दलचा रु. ५००१/-  चा पुरस्कार १९९३ साली मा. मोहन धारिया, पुणे यांचे शुभहस्ते प्राप्त.

४)  सातारा जिल्हा ग्रंथालय संघ सातारा, यांचा १९९५ - ९६ चा 'डॉ.एस.आर. रंगनाथन आदर्श ग्रंथपाल' पुरस्कार प्राप्त.

५)  महाराष्ट्र शासनाचा 'उत्कृष्ठ ग्रंथालय सेवक' ग्रंथमित्र पुरस्कार २००१ - २००२ चा. मा. शिक्षण मंत्री यांच्या हस्ते. १४ - ४ - २००२ रोजी प्रदान.

इतर गौरव :

१)  'यशवंतराव चव्हाण विविधांगी व्यक्तिमत्व' या ग्रंथात मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय, मुंबई यांचे कै. प्रा.वि.ह.कुलकर्णी पारितोषिक रु. १५००/- व मानपत्र.

२)  यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई यांची स्व. चव्हाणसाहेबांचे साहित्य संग्रहित करणे व संशोधन कार्यासाठी १९९७ साली रुपये एक लाखाची फेलोशिप, सन्मानपत्र व संस्थेचे आजीव सभासदत्व.