समग्र साहित्य सूची १४८

परिशिष्ट २. ग्रंथ लेखकाचा अल्पपरिचय

श्री. विठ्ठल विष्णू पाटील

जन्म : उंडाळे, ता. कराड येथे दि. २-९-१९३० रोजी एका गरीब शेतकरी  कुटुंबात

शिक्षण : एफ.वाय. आर्टस १९६२- हिंदी प्रविण, ड्रॉइंग इंटरमिजिएट

ग्रंथालय प्रशिक्षण :

१) शालेय ग्रंथपालन कोर्स- १९६५, प्रथम वर्ग, प्रथम

२) शासनमान्य ग्रंथपाल कोर्स- १९६५, प्रथम वर्ग, प्रथम

३) ग्रंथपाल डिप्लोमा कोर्स- १९६६, प्रथम वर्ग.

सेवाकार्य :

१) १९५२ ते १९५६ सदाशिवगड, ब्लॉक काँग्रेस कमिटी अध्यक्ष

२) १९६३ पासून १९९२ पर्यंत २९ वर्षे कर्‍हाड नगरपरिषद ग्रथालयात प्रमुख ग्रंथपाल म्हणून १९९२ ला सेवानिवृत्त.

३) ऑक्टोबर १९९२ पासून आजतागायत सौ. वेणूताई चव्हाण स्मारक पब्लिक ट्रस्टच्या 'संशोधन ग्रंथालयात' ग्रंथपाल म्हणून काम.

सामाजिक, शैक्षणिक व इतर ग्रंथालय चळवळविषयक कार्य :

१) सातारा जिल्हा ग्रंथालय संघाचा संस्थापक सदस्य, कार्यवाह व पदाधिकारी म्हणून ३० वर्षांहून अधिक काळ कार्य करीत आहे. विभागीय व राज्य ग्रंथालय संघाच्या कार्यकारिणीवर १० वर्षे काम.