विरंगुळा - ११३

प्रखर राष्ट्रवादी देश आहे. माझे असे मत झाले आहे की, कुठल्याही देशाची विदेशनीती समजावयाची असेल तर त्या देशातील आवडत्या विनोदी कथा (जोक्स) काय आहेत ते समजावून घेतल्या पाहिजेत. सर्व विनोदाचा विषय रशियाची थट्टा करण्याच्या उद्योगात असतो. त्यांच्या गटात आहेत, परंतु स्वत्त्व घालवले नाही. अंतर्गत समाजवादी राजवट कडक आहे आणि कार्यक्षमही आहे.

असा हा छोटेखानी पण महत्त्वाचा सुंदर देश मी पाहिला. येथील नेत्यांशी मनमुराद मोकळेपणाने बोलता आले. या आनंदाने मी परत येत आहे.
- यशवंतराव
------------------------------------------------------------

२१ जानेवारी १९७७ला यशवंतराव दिल्लीस परतले. दिल्लीतील, देशातील आणीबाणीचा धाक संपला होता. हळूहळू वातावरण निवळले आणि लोकसभेच्या निवडणुकी जाहीर करण्याचे सोपस्कार होऊन निवडणूक जाहीर झाली.
या निवडणुकीत मतदारांनी आणीबाणी बद्दलचा असंतोष मतपेटीद्वारा प्रकट केला. काँग्रेस पक्ष पराभूत झाला. केंद्रसत्ता हस्तगत करण्यासाठी आवश्यक असणारे लोकसभेतील बहुमत काँग्रेसला मिळाले नाही. जयप्रकाशजींच्या नेतृत्वाखाली नव्याने स्थापन झालेल्या जनता पक्षाने बाजी मारली. केंद्रस्थानी जनतापक्ष सत्तारूढ बनला. नवा इतिहास निर्माण झाला.

जनता पक्षाच्या खालोखाल काँग्रेस पक्ष असल्याने तो लोकसभेतील प्रमुख विरोधी पक्ष ठरला. त्यावेळी लोकसभेतील विरोधीपक्षप्रमुख ही भूमिका यशवंतरावांना सांभाळावी लागली. केंद्रस्थानी काँग्रेसची सत्ता संपुष्टात आली. विदेशमंत्रीपद जनता पक्षाकडे गेले. यशवंतरावांच्या विदेश यात्रांना पूर्णविराम मिळाला.

प्रवास थांबल्याने प्रवासातील पत्रे, नोंदी लिहिणेही थांबले. थांबले ते थांबलेच!!

केंद्रस्थानी सत्ता जनता पक्षाने हस्तगत करून पंतप्रधानपदी मोरारजी देसाई यांना स्थानापन्न केले. परंतु या पक्षाला अंतर्गत मतभेदामुळे सत्ता टिकविता आली नाही. राजकारणाची आणि सत्ताकारणाची घसरगुंडी सुरू झाली. खटपटी, लटपटी करून सत्ता संपादन करणे आणि सोडून देणे खेळ होत राहिला. इंदिरा गांधींनी आणीबाणीनंतर लोकसभेची निवडणूक जाहीर केली पण या निवडणुकीत तांत्रिक कारणामुळे त्यांना स्वत:लाच पराभव पत्करावा लागला. यशवंतरावांनी मात्र आपली प्रतिष्ठा शाबूत राखली. तसं पाहिलं तर १९४६च्या पहिल्या विधानसभेच्या
निवडणुकीपासूनचा इतिहास असे दर्शवितो की यशवंतरावांना विधानसभा किंवा लोकसभा यातील कोणत्याही निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले नाही. त्यांना पराभूत करण्याचे सर्व अटीतटीचे प्रयत्न निष्फळ ठरले.

अल्पकालीन सत्तासंपादनाच्या या चढाओढीत एकदा श्री. चरणीसिंग पंतप्रधानपदी आरूढ झाले. चरणसिंग यांच्या गटाचे संसदेत पुरेसे बहुमत नव्हते. काँग्रेस पक्षाच्या पाठिंब्याने ते पंतप्रधान झाले. काँग्रेसचेही जेमतेम पंचाहत्तर संसद सदस्य निवडून आलेले होते. काँग्रेस पक्ष हा संसदेतील बलाढ्य असल्याने उपपंतप्रधानपद काँग्रेसकडे येणे स्वाभाविक ठरले. यशवंतराव हे ज्येष्ठ नेते, ज्येष्ठ संसदपटू असल्याने उपपंतप्रधानपदी त्यांची नियुक्ती क्रमप्राप्त ठरली.