लोकनेते यशवंतराव चव्हाण - ४६

१९७०    - (१० फेब्रुवारी), औरंगाबाद मराठवाडा विद्यापीठाची ‘डॉक्टर ऑफ लॉ’ ही पदवी प्रदान.
१९७२    - सातारा मतदारसंघातून लोकसभेवर निवड, काँग्रेसने महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४३ जागा जिंकल्या.
१९७४    - (ऑक्टोबर), केंद्रीय परराष्ट्रमंत्री म्हणून निवड.
१९७५    - गियाना, क्युबा, लेबेनॉन, इजिप्त, पेरू, अमेरिका, अफगाणिस्तान, इराक, कुवेत व फ्रान्स इत्यादी राष्ट्रांना भेटी.
१९७६    - (१७ जानेवारी), परभणी, मराठवाडा कृषी विद्यापीठाची ‘डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी’ ही पदवी प्रदान.
१९७६    - (८ ऑक्टोबर), ‘सदिच्छा राजदूत’ म्हणून अमेरिकेतील होस्टन येथील टेक्सास शहरातर्फे मानपत्र.
१९७७-७८ - लोकसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून निवड.
१९७९    - (जुलै), चरणसिंग यांच्या संयुक्त मंत्रिमंडळात उपपंतप्रधान आणि गृहमंत्री म्हणून निवड.
१९८०    - साताला, मतदारसंघातून लोकसभेवर निवड (रेड्डी काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव विजयी उमेदवार)
१९८२    - इंदिरा काँग्रेसमध्ये प्रवेश.
१९८२    - आठव्या अर्थ आयोगाचे अध्यक्ष.
१९८३    - (१ जून), पत्नी सौ. वेणूताई चव्हाण यांचे निधन.
१९८३    - (७ ऑक्टोबर), आपले इच्छापत्र (वुईल) लिहिले.
१९८४    - (९ जानेवारी), सौ. वेणूताई चव्हाण स्मारक पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना व नोंदणी.
१९८४    - (७ फेब्रुवारी), ‘कृष्णाकाठ’ आत्मचरित्रः खंड पहिला प्रकाशित.
१९८४    - २४ मारेच), पुणे विद्यापीठाची सन्माननीय डी. लिट. पदवी प्रदान.
१९८४    - (१ जून), सौ. वेणूताईंची प्रथम पुण्यातिथी, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या उपस्थितीत सौ. वेणूताई स्मारकाचे भूमिपूजन.
१९८४    - (७ ऑक्टोबर), ‘कृष्णाकाठ’ या आत्मचरित्रास केसरी-मराठ सस्थेतर्फे ‘साहित्यसम्राट न. चि. केळकर पारितोषिक’.
१९८४    - (२५ नोव्हेंबर), सायंकाळी ७.४५ वाजता दिल्ली येथे निधन.
१९८४    - (२७ नोव्हेंबर), दुपारी ३.४० वाजता कराड येथे कृष्णा-कोयनेच्या प्रीतिसंगमावर अंत्यसंस्कार.