यशवंत चिंतनिका ३७

खरा पुरूषार्थ

मला वाटते, आपण समस्यांनी उत्तेजित व उव्दिग्न होतो. पण मनुष्य जोपर्यंत सुधारणेसाठी झगडतो आहे तोपर्यंत प्रश्न राहणारच. ते सोडविण्यासाठी प्रयत्न करणे हे राज्यकर्त्यांचे काम आहे. जगातील कोणत्याही प्रगत वा अप्रगत देशापुढे समस्या नाहीत, असे झालेले नाही. भारत तर एका अभूतपूर्व प्रयोगात गुंतला आहे. अनेक संकटे कोसळत आहेत. नवीन समस्या पुढे येत आहेत. पण वांछित नियतीसाठी झुंज देण्यातच खरा पुरूषार्थ आहे.