महाराष्ट्रातील दुष्काळ - 218

१)  भूजलाचा अभ्यास :

यामध्ये पाझर तलावाची क्षमता, त्याचे पाझराचे कार्यक्षेत्र, कोकणातील जांभ्या दगडातील पाझरासंबंधीचा अभ्यास.  यावर संशोधनात्मक चालू आहे.

२)  मृद व्यवस्थापनाचा अभ्यास :

यामध्ये खोल काळ्या जमिनीतील निरनिराळ्या चर योजनांचा अभ्यास, व जमिनीतील ओलाव्याचा अभ्यास जमिनीचे सिंचनक्षम वर्गीकरण, या विषयावर अभ्यास चालू आहेत.

३)  जल व्यवस्थापनाचा अभ्यास :

यामध्ये तुषार व सिंचन पद्धती व्यवस्थेमध्ये बाष्पीभवनाचा व इतर कारणाने होणारा पाणीनाश, प्रचालित फड पद्धतीचा अभ्यास, हरळीच्या अस्तरीकरणाचा अभ्यास, सिंचन कुशलतेचे मोजणी इत्यादी अभ्यास घेतले आहेत.

४)  इतर अभ्यास :

कालव्यातील पाण्याचे प्रदूषण कालव्याच्या लाभक्षेत्रात हवामान केंद्र प्रस्थापित करणे व हवामान विषयक माहिती गोळा करणे इत्यादीचा समावेश यांत केलेला आहे.

वरील अभ्यासाशिवाय भूमिगत बंधार्‍याचा अभ्यास, क्षारमय सुधारणेसाठी  चा वापर, मलचिंगचा अभ्यास हे नवीन विषय चालू वर्षामध्ये घेण्यात येणार आहेत.