• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

विविधांगी व्यक्तिमत्व-९८

सांस्कृतिक सभागृह-

सौ. वेणूताई चव्हाण स्मारक भवनाच्या पहिल्या मजल्यावर ‘सांस्कृतिक सभागृह’ सर्व सोईनीयुक्त असे बांधलेले आहे. त्याचा उदघाटन सोहळा दि. २१ जून २००१ रोजी विख्यात गानमहर्षी पद्मभूषण पं भीमसेन जोशी यांच्या सुश्राव्य गायनाने संपन्न झाला. या समारंभाचे अध्यक्षस्थान मा. शरदराव पवार यांनी भूषविले होते.

या प्रसंगी यशवंतरावांची सर्वांना तीव्रतेने आठवण झाली. कारण सौ. वेणूताई चव्हाण यांच्या पहिल्या पुण्यतिथी ( १ जून १८८४ ) रोजी पं. भीमसेन जोशी यांच्याच गायनाने साजरी झाली. त्यावेळी यशवंतराव पं. भीमसेनना म्हणाले होते की, ज्यावेळी या संस्थेच्या ‘सांस्कृतिक सभागृहाची’ उभारणी पहिल्या मजल्यावर होईल त्यावेळीही तो उदघाटन सोहळा आपल्या गायनाने संपन्न व्हावा अशी माझी इच्छा आहे. आणि यशवंतरावांच्या इच्छेचा उल्लेख पं. भीमसेननी उदघाटन प्रसंगी जेव्हा केला तेव्हा सर्वांच्या अंगावर रोमांच उभे राहिले.

या सांस्कृतिक सभागृहाची थोडक्यात माहिती खालील प्रमाणे

१) पहिल्या मजल्याचे ६८२५ स्क्वे. फूट क्षेत्रफळ आहे.

२) दुसर्‍या मजल्याचे ४४०० स्क्वे. फूट क्षेत्रफळ आहे. त्यात    बाल्कनी, स्टेजवरील गॅलरी आणि पॅसेजेस याचा समावेश आहे.

३) ऑडिटोरीयम ( नाट्यगृह ) २७५० स्क्वे. फूट प्रत्यक्ष सभागृहाचा कॉर्पेट एरिया.

४) स्टेज साईज-४४ x २५ फूट

५) खुर्च्या : खालच्या मजल्यावर-३१५  बाल्कनी-१३८

६) पहिल्या मजला ( रंगमंच सुविधा ) पुरूष-महिला-स्वतंत्र ग्रीन रुम्स. प्रसाधनाच्या सोईसह-स्वतंत्र विंग्ज.

७) दुसरा मजला-बाल्कनी, अ‍ॅडिशनल गेस्टरूम प्रसाधनाच्या सोईसह.

८) दोन्ही मजल्यावर महिला/ पुरूष प्रेक्षकांसाठी स्वतंत्र प्रसाधन गृहे.

९) लायटिंग आणि पडद्याची व्यवस्था अद्यावत सोईनी युक्त अशी आहे.

१०) संपूर्ण ऑडिटोरीयम हे अत्याधुनिक ध्वनीशास्त्रावर आधारित असून छत आणि भिंतीची विशेष रचना केलेली आहे.

११) जनरेटरची सोय केलेली आहे.

१२) वाजवी भाडे आकारले जाते. दिवसातून २ ते ३ शिफ्टस् मध्ये कार्यक्रम होतात.

या संस्कृतिक सभागृहासाठी एकूण खर्च रू. दीड कोटीच्या वर झालेला आहे. असे आहे हे ‘सांस्कृतिक सभागृह’.

यशवंतरावांनी 'कृष्णाकाठ' या आपल्या चरित्र ग्रंथाची अपर्णपत्रिका सौ. वेणूताई यांच्या स्मृतीस अर्पण करताना पुढील भावपूर्ण शब्द वापरलेले आहेत.

''आईच्या पाठोपाठ माझ्या जीवनाला आकार आणि आशय देणारी माझी प्रिय पत्‍नी...''

यशवंतराव चव्हाण व वेणूताई चव्हाण यांच्यामधील प्रीतीचा आणि स्नेहाचा गोडवा उभ्या महाराष्ट्राच्या कौतुकाचा विषय म्हणून आदर्शवत ठरो आणि ही अनंताची ज्योत देवघरातील नंदादीपाप्रमाणे सतत प्रकाशमान राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!