अभिनंदन ग्रंथ - आनंद कांतारिचा कर्मयोगी

आनंद कांतारिचा कर्मयोगी

राजा बढे

न हो विस्मृती, हें महाराष्ट्र झालें हुतातम्यांचिया रक्तदानांतुनी द्विभाषीक वेदीवरी जन्म घे, दिव्य एकात्मता प्राणयज्ञांतुनी 'आनंद कांतारि' चा कर्मयोगी समर्थास वंदा निखंदा कुणी अम्हा लाभला कर्षकाच्या कुळींचा महाधोरणी धूर्त लोकाग्रणी

सोडून सीमाहि सोडी न सीमा तुझें शांतिसौजन्य गंगाजळ खेळी तुझी खास मारील बाजी, दिसे राजकाजांत बुद्धीबळ कशी मोहरीं हालवावी खुबीने करायास प्यादीं, वजीरा शह करी निग्रही धीट सत्याग्रही हा अशा विग्रही भावनेशीं तह.

कळे बोलतांना मराठी मनाची स्मितांतूनही निश्चयी अस्मिता भाषेंतली लाघवी मार्दवी खोंच, वाणींतली सौम्य तेजस्विता फुकांचें नसे शब्दचांचल्या येथें, घुमे नाद झंकार वीणारव निघे अर्थ गंभीर संधप्रवाही मनोमंथनांतून वाक्पाटव विजीगीषु कर्तृत्व, ती सन्हेवृत्ती सहिष्णू मनोभाव संहावना विषारी विरोधास मोडून नांगी तुझे युक्तिचापल्य मोही मना कला, नृत्य, संगीत, काव्यादिका भारती संस्कृतीला मिळे मान्यता साहित्यिका, पंडिता बुद्धिमंता तुझ्या कारकीर्दीत ये धन्यता

नवें तेज घेई अतां रंगभूमी पहाया तिचा वाढता लौकिक रसास्वाद घेवोनियां तूं रसज्ञा, करी सत्कवीचे कलाकौतुक संभाव आतां पुढें एकलव्या ! प्रशंसेचिया त्या कृपासंकटा 'गुरुदक्षिणे' ला तुझ्या विक्रमाचा नको देऊं कापोनिया आंगठा

जाणीव ठेवा सुतानेच सुंता न व्हावी शिवाच्या 'अहो भूषणा' नवें ज्ञानविज्ञान तें शक्तिशाली हवा शस्त्रसंभार संरक्षणा अहोभाग्य हे भारताचे ठरावे, करावें महात्कार्य पुण्यावह आशीश लाभो प्रतापी शिवाचा धुरीणा तुला 'खड्गहस्ता'सह

वर्धिष्णु हो राज्य पुर्वोदिता या कलेने नभीं चंद्रलेखेपरी प्रभा भारताची भरावी वितानीं, तसें शांतिसाम्राज्य विश्वावरी