• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

थोरलेसाहेब पुण्यस्मृती अभिवादन (18)

या सर्व पार्श्वभूमीवर अद्रुश्य टोळीकडून आपल्या स्थलांतरानंतर १५ वर्षात म्हणजे २००० साला पर्यंतच्या काळांत देशात  दहशतवादाने ६१०१३ जणांचे बळी घेतले.  किमान सहा लाख लोकांना बेघर व्हावे लागले. सिमापार दहशतवाद रोखण्यासाठी ४५ हजार कोटी रूपये देशाला किंमत मोजावी लागली. सुरक्षा दलाने ४८ हजार टन धोकादायक स्फोटक जप्त केली. ६१ हजार लोक व ६ हजार पोलीस दहशतवादाचे बळी पडले. पार्लमेंट हाऊसवर, राज्यांच्या विधानभवनावर, धार्मिक स्थळावर विध्वंसक हल्ले, लोकप्रतिनिधींच्या हत्तेचे कट अशा अप्रीय बाबी अनुभव्या लागल्या. हे सर्व रोखण्यासाठी १९८५ साली टाडा कायदा दोन वर्षासाठी अंमलाता आला. पुढे १० वर्षासाठी वाढवला. टाडा कायद्यांतर्गत ७६ हजार जणांना स्थानबद्ध करण्यात आले. त्यातील २५ टक्के लोकावर आरोपपत्र दाखल केले नाही. ३५ टक्के जणावर खटले चालवले. त्यातील ९५ टक्के लोक पुराव्या अभावी निर्दोष सुटले. शिक्षेचे प्रमाण दीड टक्का असताना ७५ हजार निराराधांना टाडाखाली तुरूंगात डांबण्यात आले होते. या  सगळ्यांतून आम्ही मिळवले काय याचा कोणाकडे हिशोब आहे?

ज्यावेळी पहिला दगड फेकला जातो, पहिला घाव घातला जातो तेव्हा ठिणगी पडते. त्यानंतर या कृत्याचे कर्ते हात घरी जातात. असे  कोणीही असो. आपल्यामागे संकटाचे मलबे ठेवून जातात. याचा कोणीहीकडे भान नसतो.

आमच्या परिसरांत एका आघाडीच्या वृत्तपत्रांत गेल्या सप्टेंबर महिन्यात १५ तारखेच्या अंकातील संपादकीय अग्रलेखांत सद्यस्थितीत देशातील भ्रष्ट व अर्धभ्रष्ट नागरिकांची  टक्केवारी ८० प्रतिशत असल्याचा देशाच्या दक्षता आयोगाच्या सुत्राकडूनच जाहीर निरिक्षण नोंदवले गेले असून राहिलेले २० टक्के लोक आपले चारित्र्य कसेबसे टिकवून असल्याचे म्हटले आहे. हे वास्तव प्रत्येकाने स्वत:ला आरशांत पाहाता दिसेल असे सुचित केले आहे. दुस-याच दिवशी याच वृत्तपत्रांत संपादकीय अग्रलेखात ४० वर्षापूर्वी भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटण करण्याचे आवाहन करून सुरू झालेल्या आंदोलनापासून आजपर्यंत राबवलेल्या आर्थीक धोरणातूनही त्यांचे उच्चाटण नाहीच. तथापी महासत्ता व स्वावलंबी होण्याचे स्वप्न पहाताना आज जगांत भारताबद्दल जितके कुतूहुल व आकर्षण आहे, तीतकीच नाचक्कीही होत आहे. हे चित्र भविष्यातील प्रगल्भ महासत्तेचे नाही तर –हासग्रस्त देशाचे आणि बिभिस्त सांस्कृतीकतेचे आहे. या दोन्ही दिवसाचे अग्रलेखातील विवेचन वाचून मन खिन्न असतानाच त्याच महिन्यांत शेवटच्या आठवडयांत शेजारील देशांतही हीच अवस्था असल्याचा तपशील वाचायला मिळाला.

सुवर्ण काळ खंडीत झाला तरी परिवर्तीत समाजव्यवस्थेत आजही आम्ही उंच उंच गगनचुंबी इमारती बांधतो आहोत पण आमच्या वृत्ती संकुचीत बनत चालल्या आहेत. आम्ही रस्ते रुंद करु लागतो पण दृष्टीकोन अरुंद होत चालला आहे. आम्ही खूप खर्च करत असतो पण समाधान मिळवत नाही. आमच्या कुटूंबांना मोठमोठी घरे किंवा बंगले मिळतात पण स्वतंत्र राहण्याच्या हव्यासापोटी कुटूंबे छोटी होवू लागलीत. आम्ही घरांत आपल्यासाठी खूप सोयी-सुविधा करुन घेतो पण त्याचा उपभोग घेण्यासाठी आमच्याकडे वेळ नसतो. आमच्यात खूप पदव्या मिळवल्या जातात पण शहाणपण कमी येते. आमच्यांत ज्ञान असले तरी आजुबाजूच्या परिस्थितीचे भान रहात नाही व अंदाज येत नाही. आमच्या कारखान्यांत तज्ञ खूप असतात पण प्रामाणिकपणा क्वचितच आढळतो. आम्ही खूप औषध घेतो, उपचार करतो पण तंदुरुस्त व सध्दृढ नसतो. रात्री उशीरा पर्यंत जागतो पण वाचन क्वचितच करतो. मनोरंजनात खूप वेळ घालवतो परंतू मैदानांत खेळायला वेळ मिळत नाही. खूप गप्पागोष्टी करतो पण त्यांत जिव्हाळा नसतो, आम्ही चरितार्थ शिकलो आहोत पण जिवन जगायला शिकत नाही. आमच्या मालमत्तेत भर पडत जाते पण जिवनमुल्ये दिवसेंदिवस कमी होत चालली आहेत. आम्ही अंतराळात जावू शकलो तथापी नव्या शोजा-याला भेटण्याचा त्रास आम्ही घेत नाही. बाहेरचे अवकाश आम्ही जिंकलो आहोत पण अंतरंगातील अवकाशावर स्वार होवू शकलो नाही, आम्ही संख्यात्मक प्रगती केली आहे. पण गुणात्मक नाही. हवा, पाणी, शुद्धीकरणाची आम्ही वैज्ञानिक प्रगती करु शकलो पण आपल्या आत्म्याच्या शुद्धीकरणाची आम्हाला गरज वाटेनाशी झाली आहे. आम्ही खूप वाचन करतो पण अजिबात बोध घेत नाही. आम्ही धावपळीचे जिवन जगत आहेत पण क्षणभर विसावत नाही. आम्हाला नातलग खूप आहेत पण नाते जुळणारे नाहीत. एकूणच समाज मनाची सामाजिक मनःस्थिती या अवस्थेत परिवर्तीत झाली आहे.