• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

यशवंतराव चव्हाण यांचे समाजकारण :२

लहान वयातच ‘रा. ना.’ च्यावर झालेल्या पितृ संस्कारामुळे निर्माण झालेली वाचनाची आवड पुढे वर्धमान झाली. तुकारामाची गाथा त्यांना फार आवडत असे. त्यामुळेच ते १९३३ साली प्रार्थना समाज, ब्राह्मोसमाजाकडे आकृष्ट झाले. सत्यशोधकीय वृत्तपत्रांबरोबर त्यांना पंढरीनाथ पाटील यांनी लिहिलेले म. फुले चरित्र सन १९२७ साली वाचावयास मिळाले. अशा प्रकारच्या वाचनाच्या आवडीतून चिंतन, चिंतनातून मनन व मननातून लेखन असा प्रवास होत असताना त्यावेळच्या सामाजिक, धार्मिक, राजकीय जागृतीचा मोठा परिणाम त्यांचेवर झाला. समाज निरीक्षण प्रखर होऊ लागले. अनेक विचारवंतांची व्याख्याने ऐकण्याचे योग त्यांना मिळाले. १९३४ मध्ये पुण्यास पुढील शिक्षणासाठी गेले. तेथे तीन चार वर्षे कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांच्याशी त्यांच्या घरीदारी सहवास प्राप्त झाला. त्यामुळे त्याग, निष्ठा व कळकळ यांचा ठसा त्यांच्या मनावर उमटला. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या विचारातून तौलनिक व समन्वयवादी लेखन करण्याची दिशा त्यांना मिळाली. गुरूवर्याच्या आज्ञेने समाज प्रबोधन हे लेखनाचे कायमचे वर्धमान ध्येय बनविले. सन १९४४ नंतर वाईचे प्रकांड पंडित तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचा सहवास लाभला. त्यातून एकोणविसाव्या शतकातील प्रबोधनाचे चिंतन विकास पावले. त्यांच्या व्यासंगाने वैचारिक पिंड पक्का झाला. प्रगल्भता आली. ब्राह्मसमाज व सत्यशोधन समाज यांचे ते जोड प्रचारक बनले. महात्मा फुले यांचे कार्य व सत्यशोधक चळवळीची वैचारिक बैठक – तत्त्वज्ञान विषद करण्याचा वसा त्यांनी आयुष्यभर सांभाळला.

या लेख संग्रहाचे प्रयोजन-

१ मे १९६० रोजी मुंबईसह ‘मराठी’ भाषिक महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. १ मे २०१० रोजी या घटनेस ५० वर्ष पुरी झाली. संपूर्ण वर्षे ‘सुवर्णमहोत्सवी वर्ष’ म्हणून साजरे होत आहे. हा एक ऐतिहासिक टप्पा आहे. याप्रसंगी पुरोगामी महाराष्ट्राची वाटचाल, राज्य निर्मितीच्या वेळचे संकल्प- उद्दिष्ठे यासर्वांचे मूल्यमापन सर्व स्थरावर होणार, हे उचितही आहे. या सिंहावलोकनास ज्यांनी संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश आणला व या राज्याची धुरा पहिले मुख्यमंत्री म्हणून सांभाळून सर्वांगिण विकासाची दिशा दिली, प्रगतीपथाचे नियोजन केले, त्या लोकनेते यशवंतराव चव्हाण ज्यांना ‘आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार’ म्हणून संबोधितात, त्यंचे योगदान, संकल्पना याचा विचार करणे अपरिहार्य आहे. कारण या विचारवंत विवेकवंताने आपल्यासाठी काही स्वप्ने पाहिली होती. विकासाची दृष्टी दिली होती. भावी वाटचालीची वाटचाल करतांना या दृष्टीपासून आपण दूर गेलो नाहीना? त्याचे सुद्धा आत्मपरिक्षण करणे योग्य होणार आहे. सदर लेख संग्रहात ही दृष्टी, विचार कशा प्रकारची होती, ती कशाप्रकारे घडली याचे विश्लेषण ‘रा. ना.’ नी केले आहे.

यशवंतराव चव्हाण यांनी राष्ट्रकारण, सत्ताकारण वा राजकारण प्रामुख्याने केले, हे खरे. पण त्याचा पाया निकोप समाजकारणाचा कसा होता; हे सदरच्या पुस्तकांत विषद केले आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या विकासामध्ये समाजात आजूबाजूला घडणा-या घटना, आई विठाबाई व बंधू गणपतराव यांचे संस्कार त्यांचेवर परिणाम करत होते. परंतु स्वतंत्र बाण्याने अंगभूत विवेकशक्तीच्या आधारे त्यांनी व्यापकपणे ‘भूमिक’ घेऊन वाटचाल केली; ही त्यांची वैचारिक जडणघडण या पुस्तकांत ‘रा. ना.’ नी विषद केली आहे. १००% राजकारणांत राहून सुद्धा त्यातील राजकारण १०% व समाजकारण ९०% अशीच त्यांची वाटचाल झाली, याचे प्रत्यंतर हे पुस्तक देईल. त्यामुळे या पुस्तकाचा मथळा ‘यशवंतराव चव्हाण यांचे समाजकारण’ असाच दिला आहे. एकाच व्यक्तीवरील सर्व लेख असलेने पुनरूक्तीची दोष आहे, याची जाणीव आहे. परंतु त्यामुळे त्यांचे समाजकारण समजून घेण्यास अधिक मदत होणार आहे. वाचकाचा पत्रव्यवहार या सदरात आलेली काही दैनिकातील पत्रे या पुस्तकांत समाविष्ठ केली आहेत. वेळोवेळी आलेल्या ‘रा. ना.’ च्या प्रतिक्रिया मधून यशवंतराव यांची समाजकारणाची दृष्ठी ‘रा. ना.’ स्पष्ट करताना दिसतात. ‘रा. ना.’ यशवंतरावांच्या समकालीन होते, ते तटस्थपणे साक्षेपाने त्यांची वाटचाल पहात होते व लिहित होते, त्यामुळे या पुस्तकांचे वेगळे महत्व वाचकांच्या लक्षात येईल.

या पुस्तकांत ‘रा. ना.’ यांनी केलेल्या विश्लेषणास “कृष्णाकाठ” या आत्मचरित्रांचा उपयोग केला आहे. त्यांनी नोंदवलेली त्यांच्या विचाराची तथ्ये अधिक स्पष्ट व्हावीत म्हणून या परिशिष्ठ एक मध्ये ‘यशवंतरावांचे भाषणातील, लिखाणातील काही उतारे (quotes) उदाहरणादाखल दिले आहेत. हे उतारे तीस-पस्तीस वर्षातील कालखंडातील आहेत. त्यावरून त्यांच्या वैचारिक परिपक्वतेचा पाया किती परिपूर्ण व पुढे प्रगल्भ होत गेला; हे समजून येते. धर्मनिरपेक्षता, लोकशाही, समाजवाद आणि नियोजन हे त्यांच्या राजकीय नितीचे आधार राहिले. त्यामुळेच त्यांना त्यांच्या व्यक्तिमत्वाचा ठसा इतिहासात नोंदिविता आला.