• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

आमचे मुख्यमंत्री -८४

मुख्यमंत्र्यांचे शिक्षण

महाराष्ट्रातील सर्वच मंत्री उच्चशिक्षित आहेत. ह्याला अपवाद कन्नमवार व वसंतदादा पाटील. ह्या दोघांचे प्रापंचिक जबाबदारी व गरीबी ह्यामुळे शिक्षण होऊ शकले नाही. अर्थात त्यामुळे राज्यकारभाराला काहीही बाध आला नाही. इतरांचे शिक्षण होण्याचे कारण ते त्यांना परवडणारे होते. तर यशवंतराव चव्हाण, अंतुले ह्यांच्या पालकांनी शिक्षणाचे महत्व जाणले होते. तर काही महात्मा फुले व भाऊराव पाटील ह्यांच्या परंपरेत वाढले होते.

मुख्यमंत्री होण्याआधीचा राज्यकारभाराचा अनुभव

बाळासाहेब खेर, धनजी शा. कूपर, मनोहर जोशी हे मुख्यमंत्री सोडले तर इतरांना मंत्री वा उपमंत्री म्हणून अनुभव होता. तसे पाहिले तर मनोहर जोशी व कूपर ह्यानाही स्थानिक स्वराज्य संस्थेतील कारभाराचा अनुभव होता. बाळासाहेब खेर व कूपर ह्यांना असा अनुभव नव्हता याचे कारण त्यांच्या नेमणुकीपासूनच हे पद व मंत्रिपदे अस्तित्वात आली (१९३७). नारायण राणे, मनोहर जोशी व कूपर हे मुख्यमंत्री सोडले तर बाकीचे मुख्यमंत्री कॉंग्रेसचे होते. शरद पवार हे कॉंग्रेसचेही मुख्यमंत्री होते व त्याआधी ते काही काळ पुरोगामी आघाडीचे मुख्यमंत्री होते.

पक्षनिहाय मुख्यमंत्री

मनोहर जोशी आणि नारायण राणे हे शिवसेनेचे मुख्यमंत्री होते (युतीचे). शरद पवार हे काही काळ पुरोगामी गटाचे मुख्यमंत्री होते. बाकीचे सर्वजण कॉंग्रेसचे मुख्यमंत्री होते.

मुख्यमंत्रिपदाचा काळ

महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांच्या कारकिर्दीचा काळ बघितला तर असे दिसते की थोड्या काळापुरता का होईना, एक एक व्यक्ती दोन दोनदा वा चार चारदा मुख्यमंत्री होत्या. बाळासाहेब खेर, यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण आणि विलासराव देशमुख हे दोनदा मुख्यमंत्री झाले तर शरद पवार, वसंतदादा पाटील हे चारदा मुख्यमंत्री झाले. सुशीलकुमार शिंदे, नारायण राणे, मनोहर जोशी, सुधाकरराव नाईक, वसंतराव नाईक, अंतुले, कन्नमवार, शिवाजीराव पाटील निलंगेकर, कूपर, मोरारजी देसाई हे एकेकदाच मुख्यमंत्री झाले. एकापेक्षा जास्त मुख्यमंत्रिपदाची संधी मिळविणारे कॉंग्रेस पक्षाचे आहेत. ह्याला थोडासा अपवाद शरद पवारांचा. काही काळ ते पुरोगामी आघाडीत होते.