• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

यशवंतराव चव्हाण यांचे समीक्षा लेखन आणि भाषणे ९७

यशवंतराव चव्हाण यांचा दृष्टिक्षेपात जीवनपट

- १९१३ मार्च १२, पूर्वीच्या सातारा जिल्ह्यातील ( सध्या सांगली जिल्ह्यातील नवीन पलूस तालुक्यात ) देवराष्ट्रे गावी मातोश्री विठाबाईच्या पोटी जन्म ( कृष्णाकाठ आत्मचरित्र ग्रंथातून)
   पूर्ण नाव : यशवंतराव बळवंतराव चव्हाण

- १९१८-१९१९, कराड येथे प्लेगच्या साथीत पिता बळवंतराव यांचे निधन, वयाच्या ४ थ्या वर्षी पितृछत्र हरपले. देवराष्ट्रे येथील प्राथमिक चौथीपर्यंतचे शिक्षण व नंतर कराड येथे शिक्षणासाठी दाखल.

- १९२७ साली, कराडच्या केंद्र शाळेतून व्हर्नाक्युलर फायनल परीक्षा पास व कराड येथील टिळक हायस्कूलमध्ये प्रवेश.

- १९३०, १४ मार्च, पुणे येथील वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे १५०/- रु. चे बक्षीस मिळविले.

- १९३० ते १९३२ टिळक हायस्कूलमध्ये झेंडावंदन करून म. गांधींच्या कायदेभंग चळवळीमध्ये सहभाग ( असहकार) व १८ महिन्यांची शिक्षा.

- १९३३ मे, तुरुंगातून सुटका

- १९३४, मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण आणि कोल्हापूर येथील राजाराम महाविद्यालयात प्रवेश, प्राचार्य बाळाकृष्ण, ना. सी. फडके यांच्यासारखे नामवंत प्राध्यापक लाभले.

- १९३५, महाराष्ट्रातील समाजवादी पक्षाचे संस्थापक सदस्य.

- १९३८, इतिहास व राजकारण हे विषय घेऊन मुंबई विद्यापीठाची बी. ए. पदवी परीक्षा उत्तीर्ण. पुणे येथील लॉ कॉलेजमध्ये प्रवेश.

- १९४०, एल. एल. बी. परीक्षा उत्तीर्ण व वकिली व्यवसायास प्रारंभ.

- १९४०, सातारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष

- १९४२ जून २, फलटण येथील मोरे यांची कन्या वेणुताई यांच्याशी विवाह.


- १९४२ ऑगस्ट ९, म. गांधींच्या 'चले जाव' घोषणेमुळे राजकीय जीवनास कलाटणी, विशाल सातारा जिल्ह्याचे नेतृत्व, भूमिगत चळवळीत प्रवेश, चळवळीत संचालन आणि मार्गदर्शन.

- १९४२ साली कराड येथे भरलेल्या दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलनातील परिसंवादाचे अध्यक्ष.

- १९४२, रुग्ण पत्नी सौ. वेणुताई यांना भेटण्यासाठी फलटण येथे आगमन झाले असता पोलिसांनी अटक केली. एका नातेवाईक पोलिस अधिका-यानेच पकडून देण्यासाठी मदत केली.

- १९४३ थोरले बंधू ज्ञानोबा यांचे देहावसान

- १९४४, राजकीय विषयावर कविता ( तुरुंगवास)

- १९४५, तुरुंगातून सुटका