• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

विरंगुळा - ५४

'हाऊसबोट' म्हणून श्रीनगरचे एक वैशिष्ट्यपूर्ण अंग आहे. याला नौकागृह म्हणता येईल. झेलम नदीवर आणि लहान दाल व डे दाल या सरोवरावर जिकडे पहाल तिकडे चांगल्या तऱ्हेने सजविलेल्या बंगलेवजा या नावा असतात. त्यांची नावेही मोठी विलक्षण असतात. 'फरगेट मी नॉट' आणि 'मिस् अमेरिका' ही वानगीदाखल दोन नांवे आठवणीत ठेवली. या नौकागृहात श्रीनगरला आलेले अनेक लोक महिने न् महिने सहकुटुंब राहू शकतात. यांची भाडी दररोज दोन रुपयापासून ४०/५० रुपयांपर्यंत असतात असे समजले. या नौकागृहाचा धंदा करणारी विशिष्ट जमातच आहे. घरांची अडचण या तऱ्हेने दूर केली जाते असे दिसले. आमचे श्री. ब्रह्मे आणि सिंगमावशी या नौकागृहातून मुक्कामाला आहेत.

आज ११ जून. गेले तीन चार दिवस कॉन्फरन्स आणि प्रवासातच गेले. त्यामुळे लिहिण्यासाठी थोडीसुद्धा फुरसद मिळाली नाही. ता. ७ आणि ८ परिषदेच्या कामात संपूर्ण गेले. संध्याकाळी लेकवर किंवा झेलमवर 'शिकारा' मधून फिरणे किंवा दुपारच्या वेळी बाजारात फेरफटका मारणे याखेरीज अन्य काही करता आले नाही. आज दुपारी परिषद संपल्यानंतर किंवा उद्या काही बाजारहाट करावा असे ठरविले आहे. परंतु विमानाचे नक्की झाले नाही तर मोटारीने निघावे लागेल. काही झालं तरी ता.१५ ला निघून फ्राँटियरने मुंबई गाठली पाहिजे.

मध्यंतरी एक दिवस, मला वाटते ता. ९ ला आम्ही सगळेजण गुलमर्ग, सोनमर्गच्या स्वारीवर निघालो. साधी मोटार गुलमर्गपर्यंत जात नाही. जीप जाऊ शकते. तीही लष्करी अधिकाऱ्यांच्या परवानगीने. येथील फॉरेस्ट खात्याची जीप आणि लष्करी परवाना याची व्यवस्था ब्रह्मे यांनी करून ठेवली होती. त्यामुळे गुलमर्गला निघाल्यापासून दीड तासात पोहोचलो. हे ठिकाण येथून २९ मैल दूर असून पीरपंजाब रांगामधील ९॥ हजार फूट उंचीवर आहे. इंग्रजी माणसाच्या मनासारखे ठिकाण असे या स्थानाचे थोडक्यात वर्णन करता येईल. येथे येऊन मुक्कामाला राहाणारी माणसे हल्ली कमी आहेत असे दिसते. इंग्रजी राजवटीत इंग्लिश कुटुंबे येथे गर्दी करत असत. चहाच्या बशीच्या आकाराचे हे ठिकाण आहे. कडेने चोहोबाजूंनी झाडांच्या रांगा व त्यात अधून मधून डोकावणारी घरे. मधेच एखाद्या बाजूला छोट्याशा बाजारपेठेची घरांची रांग, किंचितसे उंच असे एक देऊळ. जवळ जवळ मध्यावर उंचेलीशी टेकडी. आवती भोवती विस्तीर्ण अशी हिरवी मैदाने हे या स्थानाचे रंगरूप आहे. दक्षिणेच्या बाजूला पूर्व-पश्चिम जाणारी उंचच्या उंच डोगरांची रांग आणि तीही बर्फाच्छादित शिखरे हे या स्थानाचे दुसरे ठिकाण आहे. याची उंची अकरा हजार फूट आहे. गुलमर्ग येथेच दुपारचे जेवण करून घोड्यावरून खिलनमर्ग गाठले. एक तासाचा हा प्रवास आहे. खिलनमर्ग येथून नंगा पर्वताचे दर्शन घडते असे ऐकले होते. आम्ही तेथे पोहोचल्यानंतर सूर्यप्रकाशाने आम्हाला हात दिला. उत्तरेची शिखरे पाच-दहा मिनिटासाठी अगदी स्वच्छ झाली. दूरवर मोठमोठ्या हिमाच्छादित पर्वताच्या रांगा. त्या पाठीमागे त्रिकोणी आकाराचे एक पर्वत शिखर आपली मान उंच करून अभिमानाने उभे होते. २६ हजार फूट उंचीचा नंगा पर्वत तो हा असे आम्हास सांगण्यात आले.