• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

विरंगुळा - ४९

''सेसिल हॉटेलच्या माझ्या खोलीतून दिसणारा सिमला'' अशा शीर्षकाखाली एक वर्णनात्मक निबंध लिहावा असा मोह झाला पण वेळ कोठे आहे? त्यासाठी आवश्यक असणारी बैठक मारण्याचा धीर कोठून आणायचा? पहाटे दक्षिणेच्या खिडकीतून बाहेर दूरवर आणि खाली नजर टाकताना अलकावती नगरीत तर आपण नाही ना? असे वाटते. उजवीकडे एकटक पाहिले म्हणजे वाटते सिमल्याची घरे हाताच्या बोटावर मोजण्याइतकी कमी आहेत. तरी पण पुन्हा बाहेर डोकावून डावीकडे नजर टाकताच असंख्य दिव्यांनी व्यापून गेलेली ती डोंगरांची पाठ पाहिली म्हणजे आपण एका शहरात आहोत याची खात्री पटते. माझ्या खिडकीच्या खालून काही फुटावरून रेल्वे जाते हे दृश्य मोठे मजेदार आहे. पण हे सर्व सविस्तर लिहिणे शक्यच नाही.

आता सकाळच्या परिषदेच्या अधिवेशनास जाण्याची वेळ होत आली. उठलेच पाहिजे.
-यशवंतराव

पुरवठा व स्थानिक स्वराज्य खात्याचे मंत्री असताना १९५२ ते १९५५ अखेरपर्यंत यशवंतरावांना परिषदांच्या निमित्ताने, अ. भा. काँग्रेसची अधिवेशने, वर्किंग कमेटीच्या बैठकी यासाठी सतत प्रवास करावे लागले. या प्रवासात ते ज्या शहरात पोहोचले आणि दोन-तीन दिवस मुक्काम केला त्या शहरांची वैशिष्ट्ये आणि प्रवासी मार्गावरील निसर्ग, दृश्ये, भेटीगाठी इत्यादि विषयी त्या त्या वेळी तपशीलवार लिहिलेले आढळते. सिमला भेटीनंतर त्यांची काश्मीर भेट झाली, अमृतसर भेट झाली. काश्मीरमध्ये श्रीनगरला एक परिषद होती. जून १९५६ मध्ये ही परिषद झाली. त्या अगोदर अमृतसरला १९५५ मध्ये काँग्रेस अधिवेशन झाले. अमृतसर अधिवेशनाच्या वेळी काँग्रेसचे अध्यक्ष श्री. ढेबर यांनी महाराष्ट्रातील संयुक्त महाराष्ट्र निर्मितीचा विषय आणि प्रामुख्याने मुंबई शहरासंबंधीचा प्रश्न याविषयी चर्चा केली. संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्नावर महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षीय मंत्र्यांनी राजीनामे सादर करण्याचा निर्णय केलेला होता. श्री. हिरे यांनी त्याकामी पुढाकार घेतला होता. संयुक्त महाराष्ट्र आणि मंत्र्यांचे राजीनामे यासंदर्भात यशवंतरावांनी श्री. ढेबर आणि पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्याशी चर्चा करून आपले मत नोंदविले. या चर्चेचा सारांश त्यांनी स्वत:च शब्दांकित करून ठेवला आहे. त्यावरून संयुक्त महाराष्ट्र निर्मितीच्या संदर्भात यशवंतरावांचे मन, मत आणि खटपट सारा लिखित आधार असून तोही त्यांच्या हस्ताक्षरात त्यांनी नमूद करून ठेवला आहे. अमृतसर येथून त्यांनी जे लिहिले आहे त्यात ते म्हणतात-
-------------------------------------------------------------------------