Amache Mukhyamantr


आमचे मुख्यमंत्री
      

संपादक : डॉ. रामकृष्ण रायरीकर

          :  डॉ. श्रीनिवास सुरनीस
-------------------------------

pdf inmg Ebook साठी येथे क्लिक करा 

प्रस्तावना

भारतामध्ये महाराष्ट्राची गणना प्रगत राज्यांमध्ये होते ही काही योगायोगाची बाब नव्हे. स्वातंमान वाटावा व इतत्र्यप्राप्तीनंतरची साडेपाच शतके महाराष्ट्राला जे राजकीय स्थैर्य लाभले त्याचाच हा परिपाक आहे. या आजपर्यंतची महाराष्ट्राची या सर्व क्षेत्रांतील कामगिरी कोणत्याही मराठी माणसाला अभिर राज्यांना हेवा वाटावा अशीच आहे. म्हणूनच आपल्या मुख्यमंत्र्यांच्या स्थैर्यामुळे महाराष्ट्राला कर्तत्ववान अशा मुख्यमंमाजिक कार्ची तपशीलवार नोंद घेणे अगत्याचे होते व ही नोंद घेण्याचे महत्त्वाचे कार्य या ग्रंथाद्वारे झालेले आहे.

लेखकांनी मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री मा. श्री. धनजी शा. कपूर (त्यावेळी त्यांना पंतप्रधान असे बिरुद होते) ह्यांच्यापासून ते मा. श्री. विलासराव देशमुखांच्या कार्याचा आढावा ह्या पुस्तकामध्ये घेतलेला आहे. एका परीने पाहता महाराष्ट्राच्या स्वातंत्र्योत्तर कालखंडाचा हा संक्षिप्त इतिहास आहे. लेखकाच्याच शब्दांत सांगायचे झाले तर त्यांनी हे लेखन क्रिकेटच्या समालोचकाच्या भूमिकेतून केलेले असून वस्तुस्थितीचे वर्णन त्याने कोणतेही भाष्य न करता केलेले आहे.

लेखकांनी वस्तुस्थितीचे वर्णन करताना आणि राजकीय व सामाजिक घटनांचा अभ्यास करताना बारीकसारीक तपशीलांची जी नोंद केलेली आहे तला दाद द्यावीशी वाटते आणि त्यांच्या प्रदीर्घ साधनेचा प्रत्यय येतो. कोणता मुख्यमंत्री विशिष्ट निवडणूक किती साली जिंकला, कोणत्या मतदारसंघातून लढला, अशा प्रकारचा तपशील सर्वसामान्य वाचकाला कदाचित कंटाळवाणा वाटेल, परंतु इतिहासाची नोंद होण्याच्या दृष्टीने ते महत्त्वाचे आहे. पॉलिटिक्स घेऊन पदवी परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांना या पुस्तकाचा अतिशय उपयोग होईल याची खात्री आहे.

लेखकांनी मा. श्री. यशवंतराव चव्हाण, मा. श्री. मोरारजी देसाई, मा. श्री. शरद पवार ह्यांच्यासारख्या लोकप्रिय नेत्यांबद्दल जेवढ्या आत्मीयतेने निहिले आहे तेवढ्याच आत्मीयतेने त्या मानाने मी लोकप्रिय असणा-या मा. श्री. बाबासाहेब भोसले, मा. श्री. शिवाजीराव पाटील यांसारख्या नेत्यांच्या कामगिरीबद्दलही लिहिले आहे. छोट्या नेत्यांची विधायक कार्ये लेखकांच्या सूक्ष्म नजरेतून सुटलेली नाहीत हे या ग्रंथाचे एक वैशिष्ट्य म्हणता येईल.